मोठी बातमी! भाजप नेत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दणका, थेट अटक

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित यांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मोठी बातमी! भाजप नेत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दणका, थेट अटक
भाजप नेत्याला न्यायालयीन कोठडी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 9:56 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित यांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयाने आकाश पुरोहित यांची थेट न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. तारखेला हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. दरम्यान वॉरंट रद्द करण्यासाठी आकाश पुरोहित यांंनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु मुंबई सत्र न्यायालयाने आकाश पुरोहित यांचा अर्ज फेटाळून लावला, त्यानंतर आता त्यांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने आकाश पुरोहित यांना अटक करण्यात आली होती, दरम्यान ते आता उद्या मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?  

२०२० मध्ये वीज पुरवठ्याच्या मुद्द्यावर आंदोलनाचं हे  प्रकरण आहे.  आंदोलनादरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचा तसेच पोलिसांना मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांच्यासह २० जणांवर या प्रकरणात आरोप आहेत. आज तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवली जाणार होती आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी आकाश पुरोहित यांची उपस्थिती आवश्यक होती.मात्र पुरोहित आणि इतर काही आरोपी हजर नसल्याने सुनावणी तहकूब करावी लागली.

दरम्यान त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं, त्यानंतर आकाश पुरोहित हे कोर्टासमोर हजर झाले, त्यांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज केला, परंतु कोर्टाने हा अर्ज फेटाळला, त्यानंतर आकाश पुरोहित यांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

उद्या जामिनासाठी अर्ज  

दरम्यान आज आकाश पुरोहित यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, ते आता उद्या मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार आहेत. आरोपींची ओळख पटविण्यासाठी आकाश पुरोहित यांची उपस्थिती आवश्यक होती.मात्र पुरोहित आणि इतर काही आरोपी हजर नसल्याने सुनावणी तहकूब करावी लागली, त्यामुळे न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us