AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस भरतीबाबत महत्वाची बातमी! वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आता आणखी संधी देण्यात येणार आहे.

पोलीस भरतीबाबत महत्वाची बातमी! वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार
Police Bharti
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 12, 2025 | 10:49 PM
Share

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी काळात राज्यात सुमारे 15 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरकारने गुड न्यूज दिली आहे. या उमेदवारांना आता आणखी संधी देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना संधी मिळणार

राज्य सरकारने 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा संपलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अशा उमेदवारांना विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गृह विभागाने 10 सप्टेंबर 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शेकडो तरुणांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

आधी कोरोना आणि नंतर इतर काही कारणांमुळे पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेले विद्यार्थी आणि विविध संघटनांनी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली होती,त्यामुळे आता सरकारने अशा उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारचा पोलीस भरतीबाबतचा निर्णय काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच पोलीस दलातील 15 हजार 631 पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. पोलीस दलातील पदं शंभर टक्के भरण्यात येणार आहेत. या निर्णयाअंतर्गत आता जानेवारी 2024 पासूनची रिक्त पदं भरली जाणार आहेत.  यात आता वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे.

कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार?

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता पोलीस शिपाई पदासाठी 12 हजार 399 जागांची भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण 234 जागा भरल्या जाणार आहेत. बॅण्ड्समन पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण 2 हजार 393 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारागृह शिपाई 580 पदे अशी 15 हजार 631 पदे भरली जाणार आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?