बिल गेट्सला भेटल्यानंतर डॉली चहावाल्याचे नशीब बदलले… लॅम्बोर्गिनी कारनंतर आता या अभिनेत्रीसोबत

dolly chaiwala viral video: डॉली चहावाले नागपूरमध्ये चहा विकतो. त्याची चहा प्रसिद्ध झाली आहे. अनेक ब्लॉगरकडून त्यावर व्हिडिओ बनवण्यात आले आहे. त्याची चहा पिण्याचा मोह अब्जाधिश उद्योगपती बिल गेट्स यांनाही झाला आणि ते चर्चेत आले.

बिल गेट्सला भेटल्यानंतर डॉली चहावाल्याचे नशीब बदलले... लॅम्बोर्गिनी कारनंतर आता या अभिनेत्रीसोबत
| Updated on: Mar 06, 2024 | 8:31 AM

नागपूर | दि. 6 मार्च 2024 : अनंत अंबानी यांचे प्री वेडिंग समारंभात बिल गेट्स आले होते. या समारंभास जगभरातील दिग्गज आले होते. त्यात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स देखील पोहचले होते. अब्जाधीश बिल गेट्स यांनी डॉली चायवाल्याकडे गेले. त्याच्या टपरीवर उभे राहून चहा पितानाही बिल गेट्स दिसले. त्याचा व्हिडिओ स्वत: बिल गेट्स यांनी शेअर केला. त्यांचे आणि डॉली चहावाल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. डॉली आपली हेअरस्टाइल आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

बिल गेट्सची भेट अन्…

बिल गेट्स यांनी त्याची भेट घेतल्यानंतर त्याचे नशीब बदलले. त्याला भेटण्यासाठी आता अनेक जण येऊ लागले आहेत. त्याचा इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला गेला आहे. त्यात बॉलीवूडमधील एक कलाकार दिसत आहे. त्या व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘बॉलीवूड कलाकार निम्रत कौर डॉली याला भेटण्यासाठी डॉलीच्या टपरीवर आली. कॅप्शनमध्ये निम्रत कौर हिला तिच्या आगामी चित्रपट ‘सजनी शिंदे याच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात शुभेच्छा दिल्या आहेत.’

ती कलाकार घाबरली पण…

व्हिडिओमध्ये डॉली आपल्या वेगळ्या पद्धतीने निम्रत हिला चहा बनवून देताना दिसत आहे. तो ज्या पद्धतीने चहाचा ग्लास देतो, त्यावेळी काही सेंकद निम्रत कौर घाबरुन जाते. चहा घेतल्यानंतर ती डॉलीची भरभरुन कौतूक करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

तो फोटोही झाला होता व्हायरल

डॉली याच्याकडे बिल गेट्स गेल्यानंतर त्याचा एक फोटो व्हायरल झाला. त्यामध्ये Lamborghini च्या सुपरकार सोबत डॉली चहावाला दिसत आहे. हा फोटो पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये काहीच लिहिले नाही. ही कार घेण्यासाठी डॉली गेला होती की हा फोटो जुना आहे, यासंदर्भात काहीच उल्लेख नव्हता. परंतु त्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया युजर्सकडून दिल्या गेल्या आहेत. सध्या डॉली चहावाल्याचे व्हिडिओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.