ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटला; भाजपने ठाकरेंची राजकीय कारकीर्द काढली, विरोधकांकडूनही जोरदार पलटवार
ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटल्याचे दिसत आहे. भाजपने उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदाची राजकीय कारकीर्द काढली. त्यानंतर विरोधकांकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला आहे.

धाराशिवमध्ये ऐन दुष्काळात पाणी संघर्ष पेटला आहे. धाराशिवमध्ये कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेवरून कैलास पाटील विरुद्ध राणा जगजीत सिंह पाटील समर्थक आमनेसामने उभे ठाकले आहेत. सिंचन योजनेच्या पाहणीवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. आमदार कैलास पाटील यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी केल्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कामासाठी किती वेळा आवाज उठवला? असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला. एक टीएमसी पाण्याला मोहोळमधून विरोध झाला, तेव्हा तुमचे नेते कुठे होते? असाही सवाल उपस्थित करण्यात आला. या योजनेवरून धाराशिवमध्ये राजकारण पेटलं आहे.
पाहणीनंतर कैलास पाटील यांनी संभ्रम पसरवण्याचा स्क्रिप्टेड ड्रामा केल्याचा आरोप भाजपने केला. कृष्णा-मराठवाडा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याचा दाव भाजपने केला. पाहणीच्या निमित्ताने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला. एकीकडे दुष्काळाच्या झळा शेतकरी सहन करत आहे. तर दुसरीकडे पाण्यावरून राजकारण तापल्याचे समोर येत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
धाराशिवच्या हक्काच्या पाण्यावरून आता जिल्ह्यात राजकीय संघर्ष पेटलाय. कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेची पाहणी करत रखडलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी करणारे ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आता भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. कैलास पाटील यांच्या पाहणीला भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही काय करत होता? असा सवाल उपस्थित केलाय. तर कैलास पाटील यांचा हा संभ्रम पसरवण्याचा स्क्रिप्टेड ड्रामा असल्याचा घणाघाती आरोप भाजप सोशल मीडिया सेलकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपला प्रतिउत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये कृष्णा-मराठवाडा योजनेच्या पाण्यावरून आता ठाकरे सेना विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगताना दिसतोय.
राजू शेट्टींच्या आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा!
धाराशिवमध्ये सोलापूर-धुळे महामार्गावरील येडशी टोलनाका येथे आज राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, या आंदोलनापूर्वीच पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी नोटिशींद्वारे दिला आहे.