चांगले ठेकेदार मिळणं नशीबाचा भाग, चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान, थेट म्हणाले..
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकताच अत्यंत मोठे विधान ठेकेदारांबद्दल केले आहे. चांगले ठेकेदार मिळणं म्हणजे नशीबच असल्याचे त्यांनी यादरम्यान बोलताना म्हटले. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.

सध्या चांगले कॉन्ट्रॅक्टर मिळणं, नशीबाचा भाग झाला आहे, कारण आमचं काय आहे की, नाही.. यात देता देता ठेकेदार मरून जातात, असे विधान भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सध्या कॉन्ट्रॅक्टरला काम हवे असते, म्हणून कितीही बिलोने कमी जातो, असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे, ते सांगलीच्या विटा येथे नगरपालिकेच्या माध्यमातून साकारला जाणाऱ्या नमो उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी थेट ठेकेदाराबद्दल मोठे विधान केले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक करायचे ठरले. त्याची कॉस्ट झाली 36 कोटी आणि मी आणि देवेंद्र यांनी कुटुंब म्हणून 36 कोटीचे काम 27 कोटीच्या खाली आणले.
25 टक्के काम पूर्ण झाले आहे. पण हे काम सुप्रीम कोर्टात अडकले आहे. ते सुरु होईल. कॉन्ट्रॅक्टर बरा मिळण्यासाठी निधी मागण्यासाठी जास्त काम करावे लागेल. चांगले कॉन्टॅक्टर नगरपालिका अश्या फदयात पडत नाहीत. बरेच जण आमचे यात काही आहे का नाही असे विचारात असतात. असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. आता चंद्रकांत पाटील यांच्या याच विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.
अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरमध्ये प्रथमच भारतीय रेल्वेत वापर होणार आहे मूव्हेबल क्रॉसिंग आणि ड्युअल पॉइंट मशीन प्रणालीचा. ताशी 320 किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. रेल्वे रुळांमधील अचूकता वाढवून कंपन, आवाज आणि झीज कमी करणारे हे तंत्रज्ञान भारताच्या हायस्पीड रेल्वे प्रवासातील नवे पर्व मानले जात आहे.
एम्स नागपुर मध्ये निवासी डॉक्टरला नातेवाइकांकडून शिवीगाळ आणि मारहाण, थेट आयसीयूमध्ये घुसून निवासी डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच आरोप. वरिष्ठ डॉक्टरांसमोरच निवासी डॉक्टरची कॉलर पकडून खाली पाडले, पाठीवर मारहाण केल्याचा नातेवाइकांवर आरोप करण्यात आला आहे.