AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा; ‘मातोश्री’त बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो”, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. ठाकरेंची ही टीका भाजप नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दांत निशाणा साधला आहे.

जनाची नाही तर मनाची तरी ठेवा; 'मातोश्री'त बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 02, 2024 | 3:41 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी अतिशय तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याचा औकात नाही, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे एवढ्यावर थांबले नाहीत. तर उद्धव ठाकरे तुम्ही वाकड्यात शिरला तर तुम्हाला तसंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. तसेच आपले मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला, असा दावा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला. तसेच मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, असा घणाघातही नारायण राणे यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात आणि लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी-जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. नरेंद्र मोदी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी”, अशा शब्दांत नारायण राणेयांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.

‘षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो?’

“उद्धव वाकड्‌यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत, असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो? आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते”, असा दावा नारायण राणे यांनी केला.

“काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वत:चे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजप आणि आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना