रोहित पवार छोटा संजय राऊत बनण्याचं काम करतोय, भाजप नेत्याचे जिव्हारी लागणारे शब्द

ऑपरेशन तुडवा जाहीर करणाऱ्या संजय राऊत यांचा आज भाजपं आमदार प्रसाद लाड यांनी समाचार घेतला. "'संजय पाटील की जय हो' अशा घोषणा केल्या. जर संजय राऊत म्हणत होते की तुडवलं पाहिजे, मग वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या कार्यालयाबाहेर तुडवण्याचं काम का केलं गेलं नाही?" असा सवाल लाड यांनी विचारला.

रोहित पवार छोटा संजय राऊत बनण्याचं काम करतोय, भाजप नेत्याचे जिव्हारी लागणारे शब्द
Rohit Pawar-Sanjay Raut
| Updated on: Jun 19, 2026 | 11:19 AM

अलीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार सतत मीडियामध्ये दिसत असतात. अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन तो विषय लावून धरला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध मुद्यांवर ते व्यक्त होत आहेत. नुकतचं त्यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी अन्न त्याग आंदोलन केलं. उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्यानंतर त्यांनी बोचरी टीका केली. त्याआधी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारु पिऊन काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतर रोहित पवार यांनी थेट ते दारुचं दुकान तोडलं होतं. रोहित पवार सतत मीडियामध्ये दिसत असतात. संजय राऊत ज्या प्रमाणे दररोज पत्रकार परिषदा घेऊन भाष्य करतात, त्याप्रमाणे आता रोहित पवारही तसं करताना दिसू लागले आहेत.

त्यांच्या या राजकीय भूमिकांवर आमदार आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. रोहित पवार छोटा संजय राऊत बनायच काम करतोय असं लाड म्हणाले. प्रसाद लाड यांनी, ऑपरेशन तुडवा, राड्याची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांचाही समाचार घेतला. “संजय राऊत पोकळ बाता मारतो. राऊत कोणता शिवसैनिक आहे. राऊतने कोणाला कधी दगड देखील मारला नसेल” असं प्रसाद लाड म्हणाले.

‘संजय राऊतांनी कधी आयुष्यात एक कानफाटात कुणाला मारली नसेल’

“मी आत्ता एक व्हिडिओ पाहत होतो सोशल मीडियावर, खासदार संजय पाटील जे मुंबईचे आहेत, त्यांच्या शिवसैनिकांनी जाऊन आदित्य ठाकरेंच्या कार्यालयाबाहेर ‘संजय पाटील की जय हो’ अशा घोषणा केल्या. जर संजय राऊत म्हणत होते की तुडवलं पाहिजे, मग वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या कार्यालयाबाहेर तुडवण्याचं काम का केलं गेलं नाही?” असा सवाल लाड यांनी केला. “मला वाटतं की संजय राऊत पोकळ गप्पा मारतो. संजय राऊतांनी कधी आयुष्यात एक कानफाटात कुणाला मारली नसेल” असं लाड म्हणाले.

संजय राऊत कुठला शिवसैनिक आहे?

“संजय राऊत काय बोलतो आणि संजय राऊत कुठला शिवसैनिक आहे? शिवसैनिक जे होते ते बाळासाहेबांबरोबर होते, ते आज एकनाथ शिंदे बरोबर गेलेले आहेत. एकनाथ शिंदेंबरोबर खरी शिवसेना आहे. मला वाटतं की संजय राऊतच्या बोलण्यावरती कुठला शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, याची मला खात्री नाही आणि स्वतः उद्धवजींनाही नाही” असं प्रसाद लाड म्हणाले.

Follow Us