AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथेनॉलमुळे साखर महागली? मोठी अपडेट काय? कृषी अर्थतज्ज्ञ काय म्हणाले?

महाराष्ट्रासह देशात साखरेचे भाव वाढले आहेत, ज्यामुळे सामान्य बजेट कोलमडले आहे. अनेकजण इथेनॉलला या दरवाढीस जबाबदार धरत असले तरी, कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी हे मत फेटाळले आहे. त्यांच्या मते, साखर नियंत्रणात सरकारचे अपयश, कमी उत्पादन असतानाही निर्यात आणि बफर स्टॉकचा अभाव ही खरी कारणे आहेत.

इथेनॉलमुळे साखर महागली? मोठी अपडेट काय? कृषी अर्थतज्ज्ञ काय म्हणाले?
Sugar price hikeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2026 | 2:52 PM
Share

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 40-50 रुपये किलो मिळणारी साखर आता 70 ते 80 रुपये किलो मिळायला लागली आहे. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव प्रचंड वाढल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. साखर महागल्याने चहापासून जिलेबी, मिठाईसह सर्वच गोड पदार्थांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांचं किचनचं बजेट कोलमडलं आहे. इथेनॉलमुळेच साखरेचे भाव वाढले असल्याचा दावा सामान्य नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, खरोखरच इथेनॉल आणि साखरेच्या दरवाढीचा काही संबंध आहे का? प्रसिद्ध कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी यावर भाष्य केलं असून मोठी अपडेट दिली आहे.

कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना साखरेच्या वाढत्या भावावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साखरेचे भाव वाढले हे खरे आहे. पण साखरेवर सर्व नियंत्रण सरकारचंच आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या भावाची जबाबदारीही सरकारचीच आहे, असं सांगतानाच इथेनॉलमुळे साखर महाग झाली ही चर्चा चुकीची आहे. इथेनॉलमुळे ही तेजी आली नाही. मागच्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन कमी झालं आहे. उत्पादन कमी झालेलं असतानाही आपण साखरेची निर्यात सुरू ठेवली. त्याचप्रमाणे आपण इथेनॉलकडेही वळलो. त्याचा हा परिणाम असल्याचं विजय जावंधिया यांनी म्हटलंय. आपण साखरेचा बफर स्टॉक का ठेवला नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

सरकारला मॅनेज करण्यात अपयशी

साखरेवर सर्वस्वी सरकारचं नियंत्रण आहे. पण सरकारला ते मॅनेज करता आलं नाही. इथेनॉलसाठी आपण फक्त 32 टक्के ऊस वापरतो. जेव्हा पुरवठा नीट असतो तेव्हा व्यापारी नफा कमावतो. जेव्हा पुरवठ्याचा शॉर्टेज असतो तेव्हा तो होल्ड करतो. आंतराष्ट्रीय़ बाजारात सारखेची किंमत वाढली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साखरेचे भाव वाढवले. हे सर्व गौडबंगाल आहे, असा आरोप जावंधिया यांनी केला आहे.

ब्राझिलची नक्कल भोवली

साखरेच्या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. उपभोगत्यांनाही झाला नाही. सरकारने साखर आयात केली. ती कच्ची साखर आयात केली, असं सांगतानाच ब्राझिलमध्ये ऊस पावसाच्या पाण्यावर पिकतो. आपल्याकडे सिंचनाच्या पाण्यातून ऊस पिकवला जातो. तिकडे जास्त शेती आणि आणपल्याकडे कमी शेती आहे. पण आपण त्यांची नक्कल केली आणि आपली फसगत झाली, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी