AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभेला उभे रहा, भाजपच्या नेत्याचं कुणाला आव्हान?

| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 10:47 AM
Share

जाहीर सांगतो, ज्याला कुणाला खूमखूमी आहे. त्यांनी माझ्याविरोधात लोकसभेला लढवा. नाही तर माण तालुक्यात जाऊन विधानसभा लढवा. बघू किस में कितना है दम, असं वक्तव्य रणजित सिंह यांनी केलंय.

साताराः हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभेत उभे राहून दाखवा, असं आव्हान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिलंय. भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) हे सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) संजय शिंदे यांचा पराभव करत येथे कमळ फुलवलं होतं. रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते आहेत.

काय म्हणाले रणजित सिंह निंबाळकर ?

रामराजेंना आव्हान देत रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ‘ भाजप तर सोडा यांना राष्ट्रवादीही परत तिकीट देणार की नाही याची शंका आहे. कारण यांच्यावर विश्वास राहिला नाही. फलटणची विधानसभा राखीव आहे. त्यांच्यातील पिल्लावळ बोलत असते. मी तर आजच जाहीर सांगतो, ज्याला कुणाला खूमखूमी आहे. त्यांनी माझ्याविरोधात लोकसभाला लढवा. नाही तर माण तालुक्यात जाऊन विधानसभा लढवा. बघू किस में कितना है दम. आजच सांगतो, जाहीर आव्हान देतो. या माझ्याविरोधात लढा’

Published on: Sep 19, 2022 10:35 AM