
“आज शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आहे. मी शिवचरित्र वाचलं आहे. जिजाऊ माँ ने केवळ शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही. स्वराज, स्वधर्म आणि भाषेचा पुनरुधार करण्याची प्रेरणाही दिली. एक बालशिवाजीला समग्र देशाला एकत्र आणि स्वतंत्र करण्याचा विचार दिला. तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणाही जिजाऊ माँ साहेबांनी शिवाजी महाराजांना दिली. त्यामुळेच मी माँ साहेबांना अभिवादन करत आहे” असं अमित शाह म्हणाले. रायगडावर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते.
“मी अनेक वर्षानंतर आलो. सिंहासनाला अभिवादन करताना माझ्या मनातील भाव मी सांगू शकत नाही. ज्याने स्वधर्मासाठी, स्वराज्यासाठी मरण्याची एक जिगविषा निर्माण केली. त्यांच्या सभेत मी आज उभा आहे. मला हे वर्णन शब्दात सांगता येत नाही” असं अमित शाह म्हणाले. “अटकपासून कटकपर्यंत आणि तामिळनाडू, गुजरातसमेत सर्व देशाला स्वराज्याचं स्वप्न यशस्वी होताना दिसत होतं. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा देशातील जनता अंधकारात होती. कुणाच्या मनात स्वराज्याची कल्पनाही येऊ शकत नव्हती. दक्षिणेचंही पतन झालं,. त्यामुळे स्वराज्य आणि स्वधर्माची गोष्ट लोकांना गुन्हा वाटू लागली” असं अमित शाह म्हणाले.
…तेव्हा देश आता स्वतंत्र होईल असं लोकांना वाटलं
“पण १२ वर्षाचा मुलगा सिंधू पासून कन्याकुमारीपर्यंत भगवा फडकवण्याची शपथ घेतली. मी अनेक नायकांचे जीवन चरित्र वाचले, पण दुर्देम्य इच्छाशक्ती, मोठी रणनीती आणि ही रणनीती यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व लोकांना एकत्र करून त्यांनी अपराजित सैन्य उभारलं. भूतकाळ, वारसा काहीच सोबत नव्हता, तरीही त्यांनी मुगलशाहीला नष्ट केलं. अटकपर्यंत मावळे गेले. कटकपर्यंत गेले. बंगालपर्यंत गेले. दक्षिणेत कर्नाटकापर्यंत गेले. तेव्हा देश आता स्वतंत्र होईल असं लोकांना वाटलं. देश वाचला, भाषा वाचल्या. आज स्वातंत्र्यानंतर आपण जगात मान वरून उभं राहतो” असं अमित शाह म्हणाले.
अलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला
“अलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला. त्याची समाधी महाराष्ट्रात आहे. शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवलं गेलं पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका. हात जोडून विनंती करतो. देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे” असं अमित शाह म्हणाले. “स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे तीन विचार देशाच्या सीमेशी संबंधित नाही. मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडले आहेत. शिवाजी महाराजांनी हे विचार जगासमोर ठेवले. जेव्हा आक्रमकांनी आपल्यावर सत्ता गाजवली. गुलामीची मानसिकता रोवली तेव्हा शिवाजी महाराजांनी हे विचार दिले” असं अमित शाह म्हणाले.