शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करा, भाजप नेते विनय नातूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

शिक्षकांना दिलेला पगार आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन करा, भाजप नेते विनय नातूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रत्नागिरी : शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाकडून शिक्षण संस्थांना शिक्षकांना शाळेत बोलवू नये, असा आदेश पत्राद्वारे देण्यात आहे. या आदेशावर गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांनी आक्षेप घेतला आहे. नातू यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचा पगाराचा आणि कामाचं मूल्यमापन करावे, अशी मागणी विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे (BJP Leader Vinay Natu send letter to CM Uddhac Thackeray).

“सर्वात जास्त पगारावरील खर्च असलेल्या शिक्षण विभागाचा कोविडच्या काळात वापर करायाचा सोडून शासन संघटनांच्या पत्राप्रमाणे निर्णय जारी करत आहे”, अशी टीका विनय नातू यांनी केली.

“2020 हे वर्ष संपत आलं, मात्र तरीही शिक्षण विभागाचे शिक्षणाविषयी धोरण अद्याप ठरत नाही. आर्थिक परिस्थिती नसतानाही ग्रामीण भागातील पालकांनी मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून नवे अँड्रॉइड फोन घेतले आहेत. मुलांचे ऑनलाइन क्लास झालेत. पण अद्याप तिमाई, सहामाही परीक्षांचा पत्ता नाही”, असा टोला नातू यांनी लगावला.

“कोरोना संकट काळात अल्प मानधन घेणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी जर 100 टक्के उपस्थितीत काम करत असतील तर मुलांची शिक्षणाची सवय मोडू नये, यासाठी शालेय शिक्षकांनी शाळेत उपस्थित का राहू नये?”, असा सवालही विनय नातू यांनी केला.

हेही वाचा : उर्मिला मातोंडकरकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *