भाजप आमदारास गोळ्या घालण्याची महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल…

लोकसभा निवडणुकीतून आलेल्या अपयशातून हे सर्व बोलत आहेत. मी लोकांमध्ये राहणारा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या धमकीने काही होणार नाही. विशेष म्हणजे या वक्तव्याच्या माजी खासदार हसून समर्थन करताना दिसत आहे, हे दुर्दैव आहे.

भाजप आमदारास गोळ्या घालण्याची महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल...
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना व्यासपीठावरुन धमकी देण्यात आली.
| Updated on: Jun 23, 2024 | 2:57 PM

जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची पातळी खालवत चालली आहे. भाजप आमदारास गोळ्या घालण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी व्यासपीठावर बसून अशा स्वरूपाची धमकी देणे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच मंगेश चव्हाण या प्रकरणात

काय आहे प्रकार

महाविकास आघाडीचे पदाधिकारी माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी व्यासपीठावर भाषण केले. त्यावेळी व्यासपीठावर माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख हे देखील उपस्थित होते. त्या व्हिडिओमध्ये माजी सरपंच किसनराव जोर्वेकर म्हणतात, मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे, त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. शपथ घेऊन सांगतो मी तुला संपवून टाकेल, माझे वय 73 आहे. मला कॅन्सर, मधुमेह आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी झाडेन. मला जास्त जगायचे नाही. मला काहीच फरक पडत नाही.

गिरीश महाजन म्हणतात, हा गंभीर प्रकार

धमकी प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आमदारांना भर रस्त्यात गोळ्या घालून मारून टाकेल यापेक्षा गंभीर घटना कोणती असू शकत नाही. त्या व्यक्तीवर आता कठोर कारवाई झाली पाहिजे. व्यासपीठावर बसून अशा स्वरूपाची धमकी देणे अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. मंगेश चव्हाण हे सध्या माझ्यासोबत असून या संदर्भात तक्रार देणार आहे. मी या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचा गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

मंगेश चव्हाण म्हणतात…

धमकी प्रकरणावर बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतून आलेल्या अपयशातून हे सर्व बोलत आहेत. मी लोकांमध्ये राहणारा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या धमकीने काही होणार नाही. विशेष म्हणजे या वक्तव्याच्या माजी खासदार हसून समर्थन करताना दिसत आहे, हे दुर्दैव आहे. राजकारणात राजकीय मतभेद स्वभाविक आहे. परंतु राजकारणात अशा प्रवृत्तींना स्थान देऊ नये. या प्रवृत्तींना समाजातून तडीपार केलं पाहिजे. महाविकास आघाडी सुडाचा राजकारण करत आहे जनता या सुडाच्या राजकारणाला थारा देणार नाही.