मोठी बातमी! आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू!

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने दुचाकीला धडक दिली आहे. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू!
suresh dhas son car accident
| Updated on: Jul 08, 2025 | 4:12 PM

Suresh Dhas son car accident : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण घटना घडली आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारचा आणि दुचाकी मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर कारच्या अफघाताचे काही फोटो समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नितीन शेळके असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर-पुणे महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.  या अपघातात दुकाकीस्वार ठार झाला आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने थेट दुचाकीस्वाराला धडक दिली आहे.  दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस याने मागून जोराची धडक दिली आहे. त्यानंतर नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

फिर्यादीत नेमका आरोप काय?

मृत तरुण नितीश शेळके याचा चुलत भाऊ स्वप्नील शेळके याने या अपघातानंतर पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीनुसार मृत तरुण नितीन शेळके हा हिरो कंपनीच्या मोटारसायकलने जातेगाव फाटा येथे नगर-पुणे रोड ओलांडत होता. यावेळी एमजी कंपनीची कार भरधाव वेगाने आली. या कारने नितीन शेळके याच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोराची धडक दिली.

रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र….

त्यानंतर त्याला तत्काळ निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडून शवविच्छेदनानंतर मृतदेह नितीश शेळके याच्या कुटुंबीयाकडे सोपवण्यात आला.

दरम्यान, या अपघातानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.