AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिस्तबद्ध भाजपमध्ये राजकीय वॉर, सुरेश धस-पंकजा मुंडे एकमेकांची तक्रार नेतृत्वाकडे करणार

सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन जातात, मग धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या वेळी कॅमेरे का नेले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, मी कॅमेरे घेऊन जात नाही. कॅमेरे माझ्या मागे येतात. धनंजय मुंडे दावाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटण्यास गेले, हे खरे आहे.

शिस्तबद्ध भाजपमध्ये राजकीय वॉर, सुरेश धस-पंकजा मुंडे एकमेकांची तक्रार नेतृत्वाकडे करणार
Suresh Dhas
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 12, 2025 | 11:35 AM
Share

Suresh Dhas- Pankaja Munde: बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मतभेद बुधावारी माध्यमांसमोर पुन्हा एकदा आले. भाजप आमदार सुरेश धस आणि भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर टीका करत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करण्याची भाषा केली. पंकजा मुंडे यांनी मी राष्ट्रीय नेत्या असताना माझ्यावर सुरेश धस आरोप करतात, यामुळे आपण त्यांची तक्रार करणार असल्याचे म्हटले. त्याला उत्तर देताना सुरेश धस यांनी पक्षाचा उमदेवार सोडून दुसऱ्याचा प्रचार राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे त्यांची लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले.

काय म्हणाले सुरेश धस?

आमदार सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हे भाजपचा बुथ प्रमुख आहेत. त्यामुळे हे प्रकरण मी तापवले आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही? तोपर्यंत हे प्रकरण तेवत ठेवणार आहे. पंकजाताई म्हणतात, मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत, आम्ही भाजपचे आहोत ना. विधानसभेत त्यांची एकच जागा होती, असे त्या जाहीरपणे म्हणत होत्या. पंकजा ताईंचे आष्टी मतदार संघात कमळ चिन्ह नव्हते, त्यांचे शिट्टी हे चिन्ह होते. आमच्याकडे पंकजा मुंडे यांच्या विचारांचा माणूस आष्टीमधून निवडून आला नाही, मी भाजपचा व्यक्ती म्हणून निवडून आलो आहे. हे त्यांचे दु:ख आहे. भाजप उमेदवार ऐवजी दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे मी पंकजा मुंडे यांची तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाकडे लेखी स्वरुपात करणार आहे, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

मला समज देण्याचे कारण काय? मी पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केला नाही. त्यांनी आष्टीत कमळाचा प्रचार सोडून शिटीचा प्रचार केला. त्या बीडमध्ये माझी एकच जागा आहे, असे म्हणत होत्या. ते व्हिडिओ तुमच्याकडे आहे, असे धस यांनी सांगितले.

कॅमेरे माझ्या मागे येतात…

सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन जातात, मग धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या वेळी कॅमेरे का नेले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, मी कॅमेरे घेऊन जात नाही. कॅमेरे माझ्या मागे येतात. धनंजय मुंडे दावाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटण्यास गेले, हे खरे आहे.

संतोष देशमुख प्रकरणात मौन का होत्या

पंकजा मुंडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भेटण्यास गेल्या नाही. त्या विषयावर काहीच बोलल्या नाही. धनंजय देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाले तेव्हा पंकजा मुंडे बोलल्या नाही. पद गेल्यावर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यास उशीर झाला, असे म्हटले. आम्ही मात्र आधीपासून बोलत होतो. त्यांना या पदावरुन हटवावे, अशी मागणी करत होते. गुन्हेगारी आमच्याकडे नाही. राख परळी, वाळू परळी, सर्व गुन्हे परळीत आहे, असे धस यांनी म्हटले.

हे ही वाचा…

सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात मग धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली? पंकजा मुंडे यांचा सवाल

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार