Video : भाजपा मोर्चातील व्हायरल महिला पुन्हा भडकली, आता तर थेट…नव्या व्हिडीओची तुफान चर्चा!

मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप व्यक्त करणाऱ्या या महिलेचे नाव टीना चौधरी असे आहे. या महिलेने आता 21 एप्रिल रोजी घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या दिवशी नेमके काय घडले होते? याची सविस्तर माहिती या महिलेने दिली आहे.

Video : भाजपा मोर्चातील व्हायरल महिला पुन्हा भडकली, आता तर थेट...नव्या व्हिडीओची तुफान चर्चा!
mumbai bjp protest viral woman
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2026 | 8:54 PM

Mumbai Worli BJP Protest Viral Girl : महिलांना संसदेत आरक्षणाऱ्या कायद्यात दुरुस्तीसाठी आणलेले नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंत भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला होता. देशभरात भाजपाकूडन मोर्चे, निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातही 21 एप्रिल रोजी मुंबईत भाजपाने मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु या मोर्चामध्ये फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना सुनावल्याने मोर्चाची कमी आणि त्या महिलेचीच जास्त चर्चा झाली. विरोधकांनी तर भाजपाला महिलांनीच जागा दाखवली असे म्हणते खिजवण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या संतापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान आता या महिलेने समोर येत तिची बाजू मांडली आहे. विशेष म्हणजे तिने सर्वच राजकीय पक्षांना एक गंभीर इशारा दिला आहे. या महिलेच्या नव्या व्हिडीओचीही आता तेवढीच चर्चा होत आहे.

ती महिला मीच आहे

मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप व्यक्त करणाऱ्या या महिलेचे नाव टीना चौधरी असे आहे. या महिलेने आता 21 एप्रिल रोजी घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या दिवशी नेमके काय घडले होते? याची सविस्तर माहिती या महिलेने दिली आहे. वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात तुम्ही काळी टोपी, काळे शर्ट घातलेल्या एका महिलेचा व्हिडीओ पाहिला असेल. ती महिला मीच आहे. माझे नाव टीना चौधरी आहे. मला मागच्या काळात बरेच मेसेज आले. माझ्याविषयी चिंता व्यक्त करणारे हे मेसेज होते. मी सर्वांचे आभार मानते, असे टीना चौधरी म्हणाल्या.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

तसेच, त्या दिवशी संध्याकाळी चार वाजता मी माझ्या मुलीला संगिताच्या क्लासेसला पाठवले. मला तिला 4.45 वाजता घ्यायला जायचे होते. महेंद्रा ताजपासून मी डावीकडे टर्न घेतला. तिथे मी ट्रॅफिकमध्ये अडकले. 25 मिनिटे मी गाडीतच होते. पण तरीदेखील ट्रॅफिक काही सुरळीत झाली नाही. त्यामुळे नेमकं काय झालंय, हे जाणून घेण्यासाठी मी गाडीतून उतरले. त्यानंतर समोरच्या दोन बसेसमुळे हा सगळा गोंधळ झाल्याचे मला समजले. मी प्रत्येक पोलीस ऑफिसरला बसेस थोड्या पुढे घेण्याची विनंती केली. परंतु कोणीही प्रतिसाद दिला. साधारण दीड तास मी प्रत्येकाला विनंती करत होते, अशी माहिती या महिलेने दिली.

तुम्ही सगळेच पापाचे धनी

तसेच, उलट मंत्री गिरीश महाजन यांनी माझे ऐकून घेतले. त्यांनी निर्देश दिल्यानंतर बसेस जागच्या हालल्या आणि नंतर मी पुढे जाऊ शकले, असे या महिलेने सांगितले. चौधरी यांनी सर्व राजकीय पक्षांना मोठा इशारा दिला आहे. माझ्या नावाचा कोणीही वापर करू नये. माझ्या नावाचा वापर करून कोणीही राजकीय स्वार्थ साधू नये, असे चौधरी म्हणाल्या आहेत. तसेच प्रत्येक पक्ष अशाच प्रकारच्या पापाचा धनी आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us