रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात, प्रकरण काय? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 06, 2022 | 4:08 PM

रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात घेण्यात आला आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील यांनी कोपरखिळ्या मारल्या होत्या.

रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात, प्रकरण काय? वाचा सविस्तर
रश्मी ठाकरें
Follow us on

रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात घेण्यात आला आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील यांनी कोपरखिळ्या मारल्या होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीचा मुद्दा गेल्या अधिवेशनात खूपच चर्चेत राहिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असे सल्ले देताना दिसून आले, तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांना मुलावर विश्वास नसेल तर त्यांनी रश्मी वहिनींना चार्ज द्यावा, अशा कोपरखिळ्या मारताना दिसून आले, त्यानंतर आता हेच प्रकरण राजकारण तापवताना दिसतंय. जितेन गजारिया ने मराठी राबडी देवी असे ट्विट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरून सातत्याने भाजपकडून टीका केली जात आहे. या ट्विटवरून शिवसेनेच्या महिला नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. भाजप असे कारखाने चालवते, अशी माणसं भाजपने पगार देऊन ठेवली आहेत, अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. रश्मी ठाकरे कुणाच्या आध्यात ना मध्यात असतात, मात्र त्यांच्यावर अशी टीका होणे निंदनीय आहे, अशा भावना आता शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा नाही दिली

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी यावर व्यक्त होताना, बरं झालं राबडीदेवींची उपमा दिली, फडणवीसांच्या बायकोची नाही दिली, नायतर ती अशी डान्सिंग डॉल अशीच लोकांची प्रतिमा झाली असती अशी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बायकोविषयी तक्रार करताना तुमच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळले त्याविषयी ट्विट केलं तर बरं होईल. उगाचच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राजकारणात ओढणं बरं नाही. लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवींना मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं असेल तर आपल्याला त्याचं कौतुकच वाटलं पाहिजे. परंतु ज्या प्रकारे रश्मी ठाकरेंचं नाव घुसवण्याचं काम केलं जात आहे, त्यावरून भाजपच्या सेलला अक्कल राहिली नाही हे लक्षात येतं. ते डबक्यात आहेत. कमळ हे डबक्यात उगवतं. डबक्यातील लोकांनी दुसऱ्यांवर शिंतोडे उडवू नये. कारण तुम्ही डबक्यात आहात. तुम्ही काय आहात, भाजपमध्ये कोण काय आहे त्याविषयी आम्हाला सर्व माहिती आहे. कोणत्याही नेत्याच्या पत्नीवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Nagpur | गरिबांचे तांदुळ श्रीमंतांच्या घरी! रेशनिंगचा माल एजंटद्वारे गोदामात; तिथून पुढं राईस मिलमध्ये भेसळ, वाचा कसे आहे हे चक्र

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

VIDEO: रश्मी ठाकरेंना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर ‘डान्सिंग डॉल’ची प्रतिमा झाली असती; विद्या चव्हाणांचं वादग्रस्त विधान