Nagpur | गरिबांचे तांदुळ श्रीमंतांच्या घरी! रेशनिंगचा माल एजंटद्वारे गोदामात; तिथून पुढं राईस मिलमध्ये भेसळ, वाचा कसे आहे हे चक्र

Nagpur | गरिबांचे तांदुळ श्रीमंतांच्या घरी! रेशनिंगचा माल एजंटद्वारे गोदामात; तिथून पुढं राईस मिलमध्ये भेसळ, वाचा कसे आहे हे चक्र
रेशनिंगचा माल गोदामात जाताना कारवाई करणारे पोलीस.

एक ट्रक, एक टेम्पो, जप्त करण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या राज्यातील रेशनच्या गोण्या होत्या. आरोपी हा माल दुसऱ्या गोणीत भरून न्यायचे. रेशनिंगचा माल येत असताना चालकसुद्धा त्यातील माल चोरी करून यांना द्यायचे.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 06, 2022 | 4:03 PM

नागपूर : रेशन लोकांना फुटक देण्याचं पुण्यकर्म सरकारनं केलं. कोरोनात लोकं उपाशी राहू नये, हा यामागचा मुख्य हेतू. पण, ज्यांना गरज नाही असे काही लोकं रेशनचे तांदुळ विक्री करतात. तीन रुपये किलो खरेदी करतात नि दहा रुपये किलो एजंटांना देतात. हे एजंट मोठ्या व्यापाऱ्यासाठी काम करतात. हे व्यापारी हा रेशनचा माल राईस मिलला विकतात. राईस मिल मालक तांदळात भेसळ करून चांगल्या दर्जाच्या तांदळात मिसळवतात. अशाप्रकारे गरिबांसाठी मिळणारे तांदुळ आता श्रीमंतांच्या पोटात जाऊ लागले आहे. असे हे चक्र पोलिसानी उघडकीस आणले आहे.

तीन आरोपींना अटक

चार वेगवेगळ्या राज्यातील रेशनचं धान्य साध्या बोरीत भरून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त केला. हे सगळं धान्य गोंदिया जिल्ह्यातील एका राईस मिलमध्ये भेसळ करण्यासाठी जाणार होते. या प्रकरणी हा गोरखधंदा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी टाकली धाड

नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, रेशनचं धान्य दुसऱ्या बॅगमध्ये भरून एका ट्रकच्या माध्यमातून ते विक्रीसाठी पाठविलं जात आहे. यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. एका ट्रकमध्ये हे धान्य तांदूळ भरले होते. त्या ट्रक मध्ये 400 गोणी माल भरला होता. तर, गोदामात 490 गोणी माल होता. 890 गोणी प्रती 50 किलो माल जप्त केला आहे. यात एक ट्रक, एक टेम्पो, जप्त करण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या राज्यातील रेशनच्या गोण्या होत्या. आरोपी हा माल दुसऱ्या गोणीत भरून न्यायचे. रेशनिंगचा माल येत असताना चालकसुद्धा त्यातील माल चोरी करून यांना द्यायचे.

गोंदियातील ते राईसमिल कोणते?

काही ग्राहकांकडून सुद्धा हे स्वस्तात तांदूळ खरेदी करून तो सगळा माल गोंदियातील एका राईस मिलमध्ये भेसळ करण्यासाठी पाठवायचे, त्यातून मोठा पैसा कमवायचे. याची संपूर्ण माहिती अन्न प्रशासन विभागाला देण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणावरून ट्रक आणि इतर सगळं मिळून 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एसीपी गणेश बिरादर यांनी दिला. गरिबांच्या हिश्श्याचा हा रेशनिंगचा तांदूळ अशाप्रकारे बाजारात आणून त्याची विक्री केली. हे गोरखधंदा करणारे मोठा पैसा कमवायचे. मात्र, यात शासन आणि गरिबांचं नुकसान होत आहे.

पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाची नव्याने नोटीस

काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार?

Nagpur | हिंगण्यात लपंडाव खेळत होती मुलं; छतावरील विद्युत तारांनी केला दहावीतील विद्यार्थ्याचा घात!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें