मोठी बातमी! रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, घोषणांसह…

आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यात पंढरपूर येथे आंदोलनाकरिता बसले होते. त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची दखल सरकारने घेतली. रोहित पवार यांनी ज्याठिकाणी आंदोलन केले, तिथे आता गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले.

मोठी बातमी! रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, घोषणांसह...
Rohit Pawar
| Updated on: Jun 16, 2026 | 11:27 AM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यात आमदार रोहित पवार पंढरपूर येथे आंदोलनाला बसले होते. रोहित पवार यांनी दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनादरम्यान त्यांची मुलेही आंदोलनस्थळी पोहोचले. वडिलांना अशा परिस्थितीत पाहून लेकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल सरकारकडून घेण्यात आली. मंत्री गिरीष महाराज रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले होते. अनेकांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला नाटकबाजी म्हटले. जे लोक बीएमडब्लूमधून फिरतात, त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे काहींनी म्हटले. आता रोहित पवार ज्याठिकाणी आंदोलनाला बसले होते, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रोहित पवार यांच्या अन्नत्याग स्थळी भाजपा कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिपडले. आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध झाल्याचा दावा माऊली हळणवर यांनी केला.

यासोबतच जे कोणी आंदोलनात सहभागी होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशीही मागणी यादरम्यान त्यांनी केले. या आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव यांच्याकडून गोमूत्र शिपडण्यात आले. यावेळी काही घोषणा देखील देण्यात आल्या. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय झाल्याचा दावा करण्यात आला.

या प्रकरणावर बोलताना सक्षणा सलगर यांनी बोलताना म्हटले की, मला या गोष्टीचे आर्श्चय वाटते की, अशी जी लोक आहेत, भारतीय जनता पार्टीची देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन किंवा प्रदेशाध्यक्ष त्यांनी इकडे लक्ष दिले पाहिजे. हे असे गोमूत्र शिंपडून काय सिद्ध आपण करत आहोत हे बघितले पाहिजे. थोडे नीट पेपर फुटीवर बोलावे, देशामध्ये काय चालले यावर बोलायला हवं. पण या लोकांची त्यावर बोलायची पात्रता उरलेली नाहीये.

रोहित पवार यांनी जे आंदोलन केले ते पक्ष म्हणून नाही केलेले. हे सर्व राज्याने पाहिले. आम्हीही त्या आंदोलनात होतो. मला वाटते की, प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाहीये. शरद पवार यांचे काम सूर्याप्रमाणे आहे, कोणीही उठावे आणि काहीही बोलावे, याला महत्व नाही. हे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. कोणीही काही टिका करावी, याला महत्व नाही. सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी कोणी काम केले असेल तर ते शरद पवारांनी केले आहे.

Follow Us