AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Budget 2026 : वचननाम्यातील वचनं कागदावरच, राज्य सरकारने पालिकेच्या शिक्षण विभागाचे 7 हजार कोटी थकवले

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2026-27 चा अर्थसंकल्प ₹4248.08 कोटींचा असून, यात महायुतीच्या वचननाम्यातील अनेक वचने समाविष्ट नाहीत. राज्य शासनाकडे शिक्षण विभागाची ₹7241.38 कोटींची प्रचंड थकबाकी आहे, ज्यामुळे नवीन योजनांची अंमलबजावणी थांबली आहे. मराठी शाळांकडे दुर्लक्ष झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

BMC Budget 2026 : वचननाम्यातील वचनं कागदावरच, राज्य सरकारने पालिकेच्या शिक्षण विभागाचे 7 हजार कोटी थकवले
BMC Budget 2026
| Updated on: Feb 25, 2026 | 3:09 PM
Share

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 4248.08 कोटीच्या या अर्थसंकल्पात नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आलेला नाही. महापालिका निवडणुकीत महापालिकेने ज्या घोषणा केल्या होत्या. त्यातील एकाही गोष्टीचा समावेश या बजेटमध्ये करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सत्ता येताच दिलेल्या वचनांचा विसर पडल्याची टीका विरोधक करत आहेत. तसेच महापालिकेच्या शिक्षण विभागाची प्रचंड थकबाकी राज्यसरकारकडे आहे. तीही राज्य सरकारने दिली नसल्याचंही या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे.

महायुतीच्या वचननाम्यातील शैक्षणिक धोरणातील वचने फक्त कागदावरच असल्याचं आजच्या महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पातून दिसून आलं आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात मराठी शाळांच्या विकासाकरता वेगळी तरतुद करण्यात आलेली नाही. मात्र इंग्रजी भाषा प्रयोगशाळेसाठी 3 कोटी 87 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने 279 इंग्रजी भाषा प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. तर, नव्या सीबीएसई शाळाही सुरु केल्या जाणार आहेत. वचननाम्यातील एआय प्रशिक्षण वर्गाबाबत कोणतीही तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाहीये.

पैसे कधी देणार?

राज्य शासनाकडे बीएमसी शिक्षण विभागाची 7 हजार 241.38 कोटींची थकबाकी आहे. राज्य शासनाकडून मुंबई महानगरपालिकेला 31 मार्च 2025 पर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या खर्चापोटी 5655.30 कोटी आणि माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी 1586.08 कोटी अशी एकूण 7241.38 कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा सुरु आहे, असे सांगण्यात आले आहे.

बजेटवर प्रशासनाचा प्रभाव

दरम्यान, आजच्या बजेटवर महापालिका शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशासनाने हे बजेट बनवल्यामुळे यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची छाप दिसत नाही. प्रशासनाचा या बजेटवर प्रभाव आहे, असं सांगतानाच राज्य सरकारकडे जी थकीत बाकी आहे, त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू. गरज पडल्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जी शालेय शिक्षण विभागाची थकबाकी आहे ती घेण्यासाठी प्रयत्न करेन, असं राजश्री शिरवाडकर म्हणाल्या. हे बजेट आयुक्तानी मांडले आहे त्यावर आता चर्चा होईल. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत त्या संदर्भात ज्या काही तरतुदी करता येतील त्या आम्ही करू, असंही त्या म्हणाल्या.

ठाकरेंच्याच संकल्पना बजेटमध्ये

दरम्यान, ठाकरे गटाचे नगरसेवक आणि शिक्षण समिती सदस्य अंकित प्रभू यांनी बजेटवर जोरदार टीका केली आहे. बजेटवर सत्ताधाऱ्यांची छाप नाही. मात्र नसलेले मुद्दे केवळ प्रशासनावर ढकलून उपयोग नाही. आता वर्षभर मराठी शाळा आणि एआय करता काहीच होणार नाही का? असा सवाल करतानाच आजच्या बजेटमध्ये संकल्पना ठाकरेंच्याच दिसतात. आमच्याच योजना आज बजेटमध्ये पुढे जाणार, नव्या सत्ताधा-यांकडून काही नवीन आलेले नाही, अशी टीका अंकित प्रभू यांनी केलीय.

महापालिकेकडे 7242 कोटींची थकबाकी आहे. राज्यातही तुमचीच सत्ता आहे. तरी पैसे येत नाहीत. शाळांच्या इमारतींची कामं पूर्ण होत नाहीत.महायुतीच्या जाहिरनाम्यातील वचनं बजेटमध्ये दिसत नाहीत. महापौरांनीही आपल्या पहिल्या भाषणात एआयचा उल्लेख केला मात्र, एआयचा उल्लेख बजेटमध्येच नाही. आतापर्यंत जे ठाकरे करत होते तेच त्यांनी अर्थसंकल्पमध्ये टाकलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!