
शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त करताना सांगितले की, दोन्ही भाऊ एकत्र आल्याने त्यांना आनंद झाला आहे आणि यावेळी महापौर निश्चितच मराठी माणूस असेल.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगर परिषदेचा नगराध्यक्षपदाचा चिंतन पटेल यांनी पदभार स्वीकारला आहे. अकरा ब्राह्मणांच्या वैदिक मंत्र उच्चारात त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. शिरपूर नगर परिषदेवर गेल्या 40 वर्षांपासून माजी मंत्री आमदार अमरीश पटेल यांची सत्ता आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला अखेर दुजोरा मिळाला. तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावले गेले. राज ठाकरेंनी त्यांना त्याबद्दल विचारावं, असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना लगावला.
विंचूर येथील खरेदी केंद्रावर दीड महिन्यानंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे. सोयाबीनला 5,328 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळाला आहे. 350 शेतकऱ्यांची सोयाबीनसाठी नोंदणी केली. मक्याला 2,400 रुपये हमीभाव जाहीर, मात्र खरेदी रखडली आहे. 700 मका उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परवानगीअभावी अद्याप मका खरेदी सुरू झालीच नाही.
“काँग्रेसने स्वबळावर लढायचं जाहीर केलं. आता आणखी का बोलायचं, कोण काय म्हणतंय त्याच्याशी कर्तव्य नाही. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला काय पाहिजे ते आम्ही पाहत आहोत. सर्व पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“भाजपला काय हवं ते भाजपने पाहावं. मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहत आहोत. शरद पवारांशी चर्चा सुरू आहे. आम्ही आमची युती जाहीर केली आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. जे भाजपातील अस्सल मराठीही येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. काही भाजपमध्ये आहेत, ज्यांना भाजपचं सहन होत नाही, ते येऊ शकतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू. माझी एक मुलाखत झाली होती. मी मुद्दामहून आठवण करून देतो. त्यात मी म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली. त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या अॅड झाल्या. त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. कधी भरायची ती कळवली जाईल. महाराष्ट्र ही प्रतिक्षा करत होता. शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर घोषणा करत आहोत” असं राज ठाकरे म्हणाले.
“एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवर कोणी वाकड्या नजरेने, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्र नाही, अख्खा देश बघतोय. आता जर चुकाल तर संपाल, आता फुटाल तर संपून जालं” असं उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला आवाहन केलं.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. मी सकाळी कुणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आजही मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन राज आणि उद्धव आले आहेत असं संजय राऊत म्हणाले.
थोड्याच वेळात ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष होणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन युतीची घोषणा करणार. त्याआधी ठाण्यात फटाके वाजवत दिवाळी साजरी करणारं. उत्साहाचे वातावरण ठाण्यामध्ये दिसून येत आहे.
ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळी अभिवादन करुन पत्रकार परिषदेसाठी एकत्रित वरळीच्या ब्लू सी हॉटेलकडे रवाना. आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्या महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा होणार.
ठाकरे बंधू आज युतीची घोषणा करणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते वरळीतील हॉटेल ब्लू सी इथे रवाना होतील आणि त्यानंतर मग युतीची घोषणा केली जाईल.
परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली. गोपीनाथ गड येथे मुंडे साहेबांच्या समाधीवर नतमस्तक होत सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना विनम्र अभिवादन केले. विजयाचा हा जल्लोष एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांच्या अतिषबाजीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महायुतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे परळी शहरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्लं आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारंदवाडी गावातील तोडकर मळा येथील शेतकरी सदाशिव दळवी यांच्या शेतात ही पिल्लं आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मादी बिबट्या आपल्या पिलांच्या शोधात पुन्हा त्याच ठिकाणी येण्याची शक्यता आहे. वनविभागाने खबरदारी म्हणून ही पिल्लं सुरक्षितपणे मूळ जागीच ठेवली आहेत. मात्र, गावात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी महायुतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केला आहे. दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा आनंदच आहे, मात्र राजकारणात त्याचा फरक पडणार नाही. ठाकरेंना नगरपरिषद निवडणुकीत किती मते मिळाली, हे सर्वांना माहीत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या २४ तासांत चांदीच्या दरात तब्बल १२ हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. आता एक किलो चांदीसाठी जीएसटीसह २ लाख २८ हजार ६६० रुपये मोजावे लागत आहेत. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही ७०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा भाव १ लाख ४० हजार ८०१ रुपयांवर (जीएसटीसह) पोहोचला आहे. सलग तिसऱ्या दिवशी ही दरवाढ सुरूच असल्याने ग्राहकांमध्ये मोठी चर्चा आहे.
विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर धडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आश्रम शाळा तलाईच्या मुख्याध्यापक सह वस्तीगृहाच्या व्यवस्थापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना उघड झाल्यानंतर आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आदिवासी आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आता आम्ही कुणाबरोबर जाणार नाही,आमच्या बरोबर कोण येणार ? याची वाटाघाटी होईल, अशी भूमिका सांगलीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर करत स्वबळावर लढण्याचा इशारा भाजपाला दिला आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत इच्छुक उमेदवारांच्या मुलखाती पार पडल्या आहेत. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या मुलाखती दरम्यान मिरजेतील दिग्गज नेत्यांसह 121 जणांनी राष्ट्रवादी उमेदवारी मागणी केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार माझे महापौरांचा आजी-माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे, त्यामुळे मिरजेत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढली आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने आम्ही कोणाबरोबर जाणार नाही, आमच्याबरोबर कोण येणार आहे ?याच्या वाटाघाटी सुरू होतील,अशी भूमिका राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी जाहीर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोरच माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. ‘शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते!’.. त्याच्यावर विश्वास ठेवणे अवघड …कल्याण–डोंबिवलीतील १२२ जागांवर भाजपचे उमेदवार उभे करा…’, कार्यकर्त्यांची ताकद प्रचंड; जनतेच्या जोरावर भाजपचाच विजय होणार … असं वक्तव्य भाजप माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केलं आहे.
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मुलाखती घेण्यात येऊन संपूर्ण ७५ जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाही भाजप – शिवसेनेचा युती बाबत कुठलाही निर्णय नाही.. राष्ट्रवादी अजित पवार गट देखील महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक; समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी दाखवली आहे. लवकरच भाजप – शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची महायुती संदर्भात बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. युती अथवा महायुती संदर्भातला निर्णय होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसत आहे. जळगाव महापालिकेत 19 प्रभागातील 75 जागांसाठी पार पडत आहे निवडणूक..
दिल्लीतील बूड पुसता येत नाही, चाटता येतात… बूट चाटण्याची सध्या रंगीत तालीम सुरु… जिथे शक्य आहे तिथे युती करणार… शिवसेनेमे कोणाला विनाकारण मारलं याचं उदाहरण दाखवा… उत्तरप्रदेशात मराठी लोकांवर हल्ले.. बेळगालात 212 मराठी माणसांवर हल्ले…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोरच माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची शिवसेनेवर घणाघात ‘शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते!’.. त्याच्यावर विश्वास ठेवणे अवघड …कल्याण–डोंबिवलीतील १२२ जागांवर भाजपचे उमेदवार उभे करा’ कार्यकर्त्यांची ताकद प्रचंड; जनतेच्या जोरावर भाजपचाच विजय होणार …भाजप माजी मंत्री जगन्नाथ पाटील
गुन्हेगारीचा ठपका असणाऱ्या मयुर शिंदे यांच्या ठाण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांचा सह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा भाजप पक्षात घरवापसी करत झाला पक्ष प्रवेश. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात जयत तयारी जाहीर पक्षप्रवेशाची करण्यात आली होती. मात्र आचारसंहिता कारण दिल्यामुळे हा पक्षप्रवेश रद्द करण्यात आला होता.
तर कालच आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट. राज्यातील महायुतीतील पक्ष असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र अमरावतीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. अमरावती महानगरपालिकेतून 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडून जातात. 2017 मध्ये 45 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते त्यामुळे भाजपची एक हाती सत्ता होती…
उद्धव ठाकरे राज ठाकरे युती ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ही घटना घडेल मत आणि जागा हा विषय स्वतंत्र आहे. प्रबोधन ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारे, हे दोघे बंधू हातात हात घालून जेव्हा महाराष्ट्रासाठी रनशिंग फुंकतील, त्यावेळेस ज्या थोड्या थोड्या कुत्र्याच्या छत्र्या उगवलेले आहेत.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील उषा फाळके आणि त्यांचे पती हे आपल्या शेतवस्तीच्या परिसरातील शेतातील बांधावरून जात असताना रस्त्यात अडवून बांधावरुन जात असल्याचे कारण काढून अचानक पाच जणांनी दगडाने मारहाण केली तसेच एकाने धारदार वस्तूने चेहऱ्यावर वार केला. यामध्ये उषा फाळके या जखमी झाल्या असुन त्यांच्या शरिरीवार अनेक मारहाणीचे व्रण आहेत. बीड येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
ISRO ने मोठा इतिहास रचला अजून बाहुबली सॅटेलाईट लॉन्च करण्यात आलंय. संपूर्ण जगाच्या याकडे नजरा होत्या.
सोलापुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीच्या हालचाली वाढल्या आहेत. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षाकडून जागावाटपामुळे युतीचे घोडे अडले होते. मात्र आता जागांचे सन्मानपूर्वक वाटप करून महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यासाठी एकमत झाल्याची माहिती समोर आली असून आगामी एक – दोन दिवसात भाजपा आणि शिवसेना दोन्ही वरिष्ठ नेत्यांची संयुक्त बैठकीनंतर घोषणा होण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला यासंदर्भात नोटीस आली आहे. 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील मनपा युती आणि जागा वाटप संदर्भात आज शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांची मुंबई मध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. काल शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचे काही लोक मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप केला होता. आज दोन्ही मंत्री सावे आणि शिरसाट युती संदर्भात चर्चा करून वरिष्ठांना अहवाल देण्याची शक्यता आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे . आरटीओकडून 31 डिसेंबर पर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. यासाठी आठ सुरक्षा पत्रके तयार केले असून त्यांच्यामार्फत ब्रेथ ॲनलायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे.
उद्धव व राज ठाकरे यांच्या युतीची आज घोषणा होणार असून तत्पूर्वी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पण आज जागावाटप जाहीर होणार नसून फक्त युतीची घोषणा होईल अशी माहित समोर आली आहे.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बहुचर्चित युतीचा मुहूर्त ठरला आहे. आज दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जागावाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या युतीच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पुण्यात यंदा हुडहुडी वाढली असून डिसेंबर महिन्याने थंडीचे गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत डिसेंबरच्या अवघ्या 23 दिवसात तब्बल तेरा दिवस किमान तापमानाची नोंद एक अंकी झाली आहे. जळगावच्या पारोळा येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. कापूस खरेदीस नकार दिल्यानंतर शेतकऱ्याने शासकीय खरेदी केंद्रावरील ग्रेडरवर प्रश्नांचा भडिमार करत संताप व्यक्त करत गोंधळ घातला. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.