अविवाहीत तरुणाचा विधवा तरुणीशी विवाह, रुढी परंपरेच्या बेड्या तोडून नवा पायंडा

पतीच्या निधनानंतर पत्नीची ओळख ही विधवा (Widow wedding in buldana) म्हणून उरते. या विधवेच्या जगण्याला कुटूंब आणि समाजाच्या अनेक मर्यादा देखील पडतात.

Widow wedding in buldana, अविवाहीत तरुणाचा विधवा तरुणीशी विवाह, रुढी परंपरेच्या बेड्या तोडून नवा पायंडा

बुलडाणा : पतीच्या निधनानंतर पत्नीची ओळख ही विधवा (Widow wedding in buldana) म्हणून उरते. या विधवेच्या जगण्याला कुटूंब आणि समाजाच्या अनेक मर्यादा देखील पडतात. अशातच राजपूत समाज हा विधवेचा पूनर्विवाह करत नाही. असे असले तरी एका राजपूत समाजातील तरुणाने ही बंधने झुगारून एका विधवा तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. त्यामूळे विधवेच्या सन्मान पर्वाची विधायक सुरुवात झाल्याचा सुखद पूनर्विवाह (Widow wedding in buldana) सोहळा बुलडाणेकरांनी अनुभवला आहे.

दोन वर्षापूर्वी अमोना येथील संगिता केशव सुरडकर या तरुणीचा विवाह झाला होता. मात्र आजारपणामूळे तिच्या पतीचे निधन झाले. ऐन तारुण्यात संगिताच्या जीवनातील जगण्याचे सूर हरविले असतांना, दिवठाणा येथील ज्ञानेश्वर पुंडलीक मोरे या अविवाहित तरुणाने संगितांशी विधिवत विवाह करण्याची तयारी दाखविली. समाज काय म्हणेल याची पर्वा न करता सव येथील जगदंबा संस्थानात त्यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने गावातील मंडळी उपस्थित होते. तसेच अनेकांनी ज्ञानेश्वरचे कौतुकही केले.

आतापर्यंत राजपूत समाजात मुलीच्या पूनर्विवाहाला मान्यता नव्हती. भारतातील सर्व समाजांनी पूनर्विवाहाला मान्यता दिली. मात्र राजपूत समाजाच्या दृष्टीने आजही अनेकजण याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. आजच्या काळात मात्र विधवांच्या सामाजिक सहजिवनात अनेक सकारात्मक बदल होत आहेत.

विधवांच्या विवाहासाठी जवळपास सर्वच जातीधर्मातील लोक पूढाकार घेतांना दिसून येतात. अर्थात या मागे मूलींची घटलेली संख्या हे मूळ कारण नाकारता येणार नाही. त्यामूळे विधवांच्या सार्वत्रिक सन्मानाच्या दिशेने असणारा ज्ञानेश्वर-संगिताचा हा पूनर्विवाह समाजासमोर आदर्श असा पुनर्विवाह ठरला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *