LIVE : लातूर जिल्ह्यात विवाहितेची चिमुकलीसह आत्महत्या

[svt-event title=”भरधाव कारने एकाला उडवले, जमावाकडून कारची तोड-फोड” date=”07/02/2020,1:45PM” class=”svt-cd-green” ] नांदेड येथे एका भरधाव कारने चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर एकाला उडवले. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे नाव चांदू रघुनाथ सूर्यवंशी असून तो विश्वनाथ अप्पा हुरणे ज्युनियर कॉलेजमध्ये सेवक म्हणून कार्यरत होता. या घटनेनंतर जमावाने कारची मोठ्याप्रमाणात तोडफोड केली असून […]

LIVE : लातूर जिल्ह्यात विवाहितेची चिमुकलीसह आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 4:09 PM

[svt-event title=”भरधाव कारने एकाला उडवले, जमावाकडून कारची तोड-फोड” date=”07/02/2020,1:45PM” class=”svt-cd-green” ] नांदेड येथे एका भरधाव कारने चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर एकाला उडवले. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे नाव चांदू रघुनाथ सूर्यवंशी असून तो विश्वनाथ अप्पा हुरणे ज्युनियर कॉलेजमध्ये सेवक म्हणून कार्यरत होता. या घटनेनंतर जमावाने कारची मोठ्याप्रमाणात तोडफोड केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”लातूर जिल्ह्यात विवाहितेची चिमुकलीसह आत्महत्या ” date=”07/02/2020,1:39PM” class=”svt-cd-green” ] लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव इथं एका विवाहितेने आपल्या दिड वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ज्योती अंतूर, असं या विवाहितेचं नावं आहे. तर तिच्या मुलीचं नाव उत्कर्षा आहे. पती-पत्नी मधील सततच्या भांडणाला कंटाळून ज्योतीने गावा जवळच्या विहिरीत आपल्या चिमुकल्या मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केली. [/svt-event]

[svt-event title=”नांदेड महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय ” date=”07/02/2020,1:34PM” class=”svt-cd-green” ] नांदेड महापालिकेच्या पोटनिवडणुकित कॉग्रेसचे अब्दुल गफ्फार विजयी झाले आहेत. गफ्फार यांना 6025 मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे साबेर चाऊस यांना 4159 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे नोटाला 299 मते मिळालीत. कॉग्रेसचे गफार 1866 च्या मताधिक्याने विजयी झालेत. या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत जल्लोष व्यक्त केलाय. [/svt-event]

[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमध्ये दोन वाहन चोरांना अटक ” date=”07/02/2020,1:30PM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांनी कारवाई करत दोन वाहन चोर आरोपींना अटक केली. मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणांकडून तसेच त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराकडून एकूण 10 दुचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, पती-पत्नी जखमी ” date=”07/02/2020,1:27PM” class=”svt-cd-green” ] नाशिक-मुंबई महामार्गावर खंबाळे जवळ भीषण अपघात झाला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिका कारने ट्रकला मागून जाऊन धडक दिल्यामुळे कारचा जागीच चक्काचूर झाला. कारमधील ठाणे येथील पती-पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पंढरपुरात भरलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे दोन हजार जनावरांची खरेदी-विक्री” date=”07/02/2020,1:25PM” class=”svt-cd-green” ] माघी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भरलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे दोन हजार खिलार जनावरांची खरेदी विक्री झाली. बाजारात सुमारे 60 लाख रूपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी दिली. दरवर्षी येथील बाजारात राज्यासह कर्नाटकमधूनही खिलार जातीची जनावरे विक्रीसाठी येतात. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी बाजारात कमी उलाढाल झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”बलात्काऱ्याकडून पुन्हा पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न ” date=”07/02/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ] बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक पूर्व जामीनावर बाहेर असलेल्या आरोपीने पीडित महिलेवर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील कोरेगाव-भिमा येथे ही धक्कादाय घटना घडली आहे. राहूल वाळके असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर यापूर्वी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरार शहर महानगरपालिकेचा आज पाणीपुरवठा बंद ” date=”07/02/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] वसई-विरार शहर महानगरपालिकेचा आज (7 फेब्रुवारी) पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. शहराला पाणी पुरवाठा करणार्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांट येथे आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत MSEB चे देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन असल्यामुळे या वेळेत पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू तर एक जखमी” date=”07/02/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] बुलडाण्यातील मलकापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू तर एक जखमी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या” date=”07/02/2020,9:38AM” class=”svt-cd-green” ] पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या, उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या त्रासाला आत्महत्या केली आहे. पंकज संकपाळे असं आत्महत्या केलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली असून यामध्ये तीन पोलिसांची नावं आहे. [/svt-event]

[svt-event title=”गुजरातहून 200 बकऱ्या घेऊन येणारा ट्रक उलटला ” date=”07/02/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] गुजरातहून दोनशे बकऱ्या घेऊन येणारा ट्रक उलटला. यामध्ये 70 ते 80 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद मुंबई हायवेवर गारज गावाजवळ हा अपघात झाला आहे. यामध्ये अनेक बकऱ्या जखमी झाल्या आहेत. [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.