Live Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका (Maharashtra Live Update) क्लिकवर

Live Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त
Picture

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 82,968 वर, आतापर्यंत 37,390 जण कोरोनामुक्त

06/06/2020,9:00PM
Picture

अहमदनगर जिल्ह्यात आज 9 कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज 9 कोरोना रुग्ण, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 204 वर, तर 10 व्यक्तींचा मृत्यू, 104 कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरू

06/06/2020,12:26PM
Picture

नागपूर महापालिकेचे 12 कर्मचारी बडतर्फ, आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

06/06/2020,12:24PM
Picture

ठाण्यात 125 पोलिसांची कोरोनावर मात, 15 अधिकाऱ्यांचा समावेश

06/06/2020,12:23PM
Picture

Monsoon Rain | मुंबईत पावसामुळे झाडे रस्त्यावर कोसळली

06/06/2020,12:22PM
Picture

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक, भाजप नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

06/06/2020,12:21PM
Picture

भारतात कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 36 हजार 657 वर

06/06/2020,12:20PM
Picture

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव

06/06/2020,12:18PM
Picture

नाशिक मालेगावमध्ये आणखी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक मालेगावमध्ये आणखी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णांमध्ये एका 8 वर्षीय मुलाचा समावेश, नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, नाशिक शहरातील अनेक विभाग सील

06/06/2020,12:14PM
Picture

पुणे जिल्ह्यात 12 तासात 41 कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात 12 तासात 41 कोरोना रुग्ण, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 9006 वर, तर जिल्ह्यात 401 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

06/06/2020,12:10PM
Picture

जालन्यात कोरोनाचा चौथा बळी

जालन्यात कोरोनाचा चौथा बळी, घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथील 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, मृत महिला काहीदिवसांपूर्वीच मुंबईतून जालन्यात परतली होती

06/06/2020,12:06PM
Picture

धुळे जिल्ह्यात आणखी 11 कोरोना पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात आणखी 11 कोरोना पॉझिटिव्ह, गेल्या 2 दिवसात कोरोनाचा आलेख वाढता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क, धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 215 वर, आतापर्यंत 97 रुग्णांना डिस्चार्ज, 24 रुग्णांचा मृत्यू

06/06/2020,11:59AM
Picture

औरंगबादेत कोरोना टेस्ट करण्यासाठी टाळाटाळ

औरंगबादेत कोरोना टेस्ट करण्यासाठी टाळाटाळ, औरंगाबाद महापालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांचा आरोप, कोरोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांची सुद्धा टेस्ट करण्यास टाळाटाळ, लक्षणं असतील तरच कोरोना टेस्ट, बाधित व्यक्तीच्या नातेवाईकांकडे दुर्लक्ष, कोरोना आजाराबाबत औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

06/06/2020,11:47AM
Picture

दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, आतापर्यंत एकूण 33 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यात एकूण 1498 पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणं, 195 अधिकारी आणि 1303 पोलीस कर्मचाऱ्यांत कोरोनाची तीव्र लक्षणं, पोलिसांवर हल्ल्याच्या घटना 260 तर 841 हल्लेखोरांना अटक

06/06/2020,11:39AM
Picture

सातारा जिल्ह्यात आज 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सातारा जिल्हयात आज 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, खटाव तालुक्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात सद्यस्थितीत 332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यात आतापर्यंत 260 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्हयात आतापर्यंत 26 जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू, सातारा जिल्ह्यात एकूण 619 कोरोना रुग्णांची नोंद

06/06/2020,11:29AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

06/06/2020,11:16AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *