लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये 2100 रुपयांची तरतूद नाहीच; आता देवेंद्र फडणवीस म्हणतात…

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपये वाढीबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना सुरूच राहील आणि लवकरच २१०० रुपये देण्याबाबत आश्वस्त केले आहे.

लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये 2100 रुपयांची तरतूद नाहीच; आता देवेंद्र फडणवीस म्हणतात...
devendra fadnavis ajit pawar
| Updated on: Mar 10, 2025 | 7:56 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे काही हफ्ते देण्यात आले आहेत. सरकारने विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० रुपये दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. यानंतर महायुती सरकार बहुमताने निवडून आले. त्यानंतर लाखो लाडक्या बहिणी सरकारकडून २१०० कधी मिळणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र त्यांची निराशा झाली आहे. कारण सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळे लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबद्दल कोणतीही तरतदू करण्यात आलेली नाही. यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. त्यातच आता या मुद्द्यावरुन विरोधकांनीही टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पाला भर देण्यात आली

“सरकारकडून 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प हा मांडण्यात आला आहे. देशात जीडीपीत 7.5 टक्क्यांनी आपण वाढत आहे. आपलं कर्ज वाढल असलं तर कर्ज घेण्याची क्षमता देखील वाढली आहे. बॅलेन्स ठेवून अर्थसंकल्प मांडलेलं आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये 7 टक्के आपली वाढ झाली आहे. इतर राज्यापेक्षा आपली जीएसटी कलेक्शन हे जास्त आहे. AI चा वापर करून शेतीच्या खर्चात कमी करण्यासाठी होऊ शकतो. जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पाला भर देण्यात आली. या अर्थसंकल्पाकडून आपण विकासाकडे जाऊ. यातून रोजगारच्या संधी मिळतील”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?

“अजित पवारांनी आतापर्यंत 11 वेळ अर्थसंकल्प मांडला. 13 अर्थसंकल्पचा आतापर्यंत रिकॉर्ड आहे. तो दादा या टर्ममध्ये मोडतील.आवश्यक तेवढी तरतूद केली आहे. 2100 देण्यावर आमचं काम सुरू आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचं आहे. मागच्या ट्रेंडच्यानुसार पैसे देण्यात आले आहेत. वाटलं तर पैसे वाढवता येतील. ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे. आपण बॅलेन्स तयार करत, आपण आश्वासनं पूर्ण करु”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

“एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपये मिळणार आहे. आम्ही घोषणा करू, पुढील महिन्यातून 2100 मिळणार. तसे मग देऊ. काही लपून घोषणा करणार नाही, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच अजित पवारांनीही मी शब्दांचा पक्का आहे”, बहिणींना नाराज करणार नाही, असे म्हटले.