लोखंडी रॉडने मारहाण, खुनाचा प्रयत्न; न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

| Updated on: Mar 10, 2023 | 1:27 PM

गाडीला कट का मारली यावरुन ही मारहाण केली होती. त्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.

लोखंडी रॉडने मारहाण, खुनाचा प्रयत्न; न्यायालयाने सुनावली ही शिक्षा
Follow us on

बुलढाणा : दुचाकीला कट मारल्याचा वादातून पोलीस कर्मचारी राधेश्याम वैष्णव यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तसेच खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 नुसार धाड येथील आरोपी शुभंग प्रकाश वाघूर्डे उर्फ गोप्या या मुख्य आरोपीला चार वर्षाचा सक्षम कारावास सुनावण्यात आला. तसेच साडेतीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर एकूण 6 साक्षीदार तपासले.

चार वर्षांची शिक्षा सुनावली

सरकारी वकील सोनाली अक्षय देशपांडे यांच्या युक्तिवाद ऐकून फिर्यादी पोलीस कर्मचारी राधेश्याम वैष्णव यांना लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचे ग्राह्य धरले. धाड येथील मुख्य आरोपी शुभंग प्रकाश वाघुर्डे उर्फ गोप्या यास चार वर्षाचा सक्षम कारावास व साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.


प्रकरण काय आहे?

धाड येथील शुभम वाघुर्डे याने पोलीस कर्मचारी राधेश्याम वैष्णव यांना मारहाण केली होती. त्यासाठी त्याने लोखंडी रॉडचा वापर केला होती. ही घटना २०१८ सालची आहे. गाडीला कट का मारली यावरुन ही मारहाण केली होती. त्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. ही साक्ष सुसंगत आणि विश्वासार्ह होती. वैद्यकीय पुरावाही उपलब्ध होता.

पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला मारहाण झाली होती. या सगळ्या पुराव्यांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. शुभमला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास आणि साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अशी माहिती सरकारी वकील अॅड. सोनाली देशपांडे यांनी दिली.