Video Buldana Leopard | खल्ल्याळ गव्हाण परिसरात विहिरीत पडला बिबट; वन विभागाच्या टीमने काढले सुखरूप बाहेर

बुलडाणा जिल्ह्यातील खल्ल्याळ गव्हाण येथे विहिरीत बिबट्या पडला होता. पाण्याने तुडुंब भरलेल्या शेतातील विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला पिंजर्‍यात कैद करण्यात आले. बिबट्याला सुखरूप बाहेर काढून बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जीवदान दिलंय.

Video Buldana Leopard | खल्ल्याळ गव्हाण परिसरात विहिरीत पडला बिबट; वन विभागाच्या टीमने काढले सुखरूप बाहेर
बुलडाणा जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 11:31 AM

बुलडाणा : देऊळगाव राजा वन परिक्षेत्रातील अंढेरा बीटमधील ही घटना आहे. खल्ल्याळ गव्हाण शेत (Farm) शिवारात सुखदेव उत्तम बनकर यांच्या विहिरीत काल दुपारी बिबट पडला. काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. याची माहिती वन विभागाला (Forest Department) दिली. माहिती मिळताच वन विभाग बुलडाणा येथील रेस्क्यू टीम तयार झाली. रेस्क्यू टीम सर्व साहित्य घेतले. तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. बिबट्याने या परिसरात नुकसान केले. त्यामुळं या बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्याचे ठरविलं. त्यानुसार पिंजरा (Caged) विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आलं. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी यांनी बिबट्याची तपासणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जेरबंद बिबट्याला बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आल्याची माहिती बुलडाणाचे डीएफओ अक्षय गजभिये यांनी दिली.

अशी घडली घटना

काल दुपारी बिबट पाण्याचा शोधात फिरत होता. विहिरीत त्याला पाणी दिसले. त्यामुळं कदाचीत तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज आहे. बिबट विहिरीत पडल्यानंतर बाजूच्या शेतकऱ्यांची ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच वन विभागाला याचा माहिती दिली. वनविभागाची रिक्स्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

बिबट्याला काढण्यासाठी धावपळ

बिबट्या विहिरीत पडला होता. त्यामुळं त्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. शिवाय एक खाट विहिरीत सोडण्यात आली. बिबट्या पोहून पोहून थकून गेला होता. त्यामुळं त्यानं सुरुवातीला खाटेचा आश्रय घेतला. त्यानंतर खाटेवरून पिंजऱ्यात उडी मारली.

पाहा व्हिडीओ

बिबट्याने केले नुकसान

बिबट्याने परिसरात बरेच नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळं या बिबट्याला पिंजऱ्यात बंद करून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान