Buldhana News : पूरग्रस्तांसाठी अनेक हात सरसावले, लाखो रुपयांचे शालेय साहित्य भेट

| Updated on: Aug 03, 2023 | 10:28 AM

महाराष्ट्रात जुलै महिन्यात अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, तिथं पुराचा फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात यावेळी अतिवृष्टी झाली आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांसह अनेकांना बसला आहे.

Buldhana News : पूरग्रस्तांसाठी अनेक हात सरसावले, लाखो रुपयांचे शालेय साहित्य भेट
Buldhana News
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश सोळंकी, बुलढाणा : जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (maharashtra) अनेक जिल्ह्यात पाऊस (heavy rain in marashtra) झाला नाही. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. काही जिल्ह्यात तर अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, तिथं पूर येऊन गेला आहे. पुराचा फटका शेतकऱ्यांसह अनेकांना बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात (buldhana sangrampur rain update) पुराच्या पाण्याने अनेक गावांना मोठा फटका बसला होता. मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडं पाणीचं पाणी पाहायला मिळत होतं. संग्रामपूर तालुक्यात अनेक शाळा पूराच्या पाण्यात होत्या. त्यामुळे शाळेचं मोठं नुकसान झालं होतं.

Buldhana News

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुराचं पाणी अनेक गावात घुसलं होतं. पिंपरी काथरगाव या गावात अक्षरशः वाहणाऱ्या नदीने पाण्याचे पात्र बदलून विरुध्द दिशेला वाहायला सुरुवात केली होती. त्यामुळे गावातील काही घरे, शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळाही पूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत. शाळेच्या वर्ग खोल्यात चिखल साचला होता. शालेय साहित्य पूर्णतः खराब झाले आहेत.

Buldhana News

पूराच्या फटक्याने बाधित असलेल्या गावकऱ्यांना शासनाबरोबरच सामाजिक संघटनाही मदत करायला पुढे सरसावल्या आहेत. अनेकांनी गावात धान्याचं वाटप केलं आहे. कोणी कपडे आणून दिले, तर पुन्हा एकदा गावातील शाळा सुरू व्हावी गरजेच्या वस्तू भेट दिल्या आहेत. महाविद्यालयाकडून ही काथरगावातील या जिल्हा परिषदेच्या शाळेला तीन टीव्ही, कपाट, शालेय साहित्य असं लाखो रुपयांचं शालेय साहित्य भेट दिलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Buldhana News

भारतात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होणार असल्याचं मागच्या काही दिवसात हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणं भरली आहेत. तर काही धरणं ८० टक्क्यांच्या दरम्यान भरली आहे.

Buldhana News