Video Buldana Fire | बुलडाण्यातील चांडक लाइफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला आग; साहित्यासह जवळपास दहा लाखांचे नुकसान

| Updated on: May 14, 2022 | 5:39 PM

चांडक लाईफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला दुपारी आग लागली. या आगीत कार्यालयातील साहित्य जळून खाक झाली. अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. तोपर्यंत कार्यालयातील लॅपटॉप, कम्प्युटर, फर्निचर जळून खाक झाले होते.

Video Buldana Fire | बुलडाण्यातील चांडक लाइफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला आग; साहित्यासह जवळपास दहा लाखांचे नुकसान
बुलडाण्यातील चांडक लाइफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला आग
Image Credit source: t v 9
Follow us on

बुलडाणा : शहरातील चिखली रोडवर असलेल्या चांडक लाइफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला (Office of Chandak Life Insurance) दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये कार्यालयातील लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर, फर्निचर, एसी यासह इतर साहित्य जळाल्याने अंदाजे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष (Founding President of Buldana Urban) राधेश्याम चांडक यांच्या निवासस्थानाला लागून चांडक लाइफ इन्शुरन्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात कामकाज सुरू असताना अचानक एसी मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाला. त्याने भडका उडाला. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) प्रयत्नाने जवळपास एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. त्यामध्ये ग्राहकांचे काही महत्त्वाचे दस्तावेज आधीच बाहेर काढल्याने ते सुरक्षित आहेत. कार्यालयातील साहित्य मात्र जळून खाक झालेत.

पाहा व्हिडीओ

अशी घडली घटना

चांडक लाईफ इन्शुरन्सच्या कार्यालयाला दुपारी आग लागली. या आगीत कार्यालयातील साहित्य जळून खाक झाली. अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. तोपर्यंत कार्यालयातील लॅपटॉप, कम्प्युटर, फर्निचर जळून खाक झाले होते. सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, कागदपत्र बाहेर काढल्यामुळं महत्त्वाचे दस्ताएवज सुरक्षित राहिले.

काल बर्निंग कारचा थरार

काल खामगाव येथे बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला. ही कार एक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची होती. कारचेसुद्धा सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. आज बुलडाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा आग लागली. या आगीच्या घटना उन्हामुळं लागत आहेत. उन्हामुळं थोडासा भडका उडाला तरी कोणतीही वस्तू लगेच पेट घेते.