AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिखलीत मनसे कार्यकर्ते ताब्यात, पोलिसांनी सोडले बुलढाणा जिल्ह्याबाहेर

जालना जिल्ह्याच्या हद्दीत या मनसे सैनिकांना सोडले जाणार आहे. द

चिखलीत मनसे कार्यकर्ते ताब्यात, पोलिसांनी सोडले बुलढाणा जिल्ह्याबाहेर
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 18, 2022 | 5:24 PM
Share

बुलढाणा : वि. दा. सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. शेगावच्या सभेमध्ये मनसेकडून निषेध केला जाणार होता.  राहुल गांधी यांची थोड्या वेळात सभा होणार आहे. ही सभा होण्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आता त्यांना बुलढाणा जिल्ह्याबाहेर पोलीस सोडणार आहेत. काल राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर मनसे सैनिक एकवटले होते.

मनसे सैनिक म्हणाले, आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलीस करताहेत. ते आम्हाला जिल्ह्याच्या बाहेर सोडणार. पोलिसांची पूर्णपणे दडपशाही याठिकाणी सुरू आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं मनसे पदाधिकारी यांनी सांगितलं. आमचं म्हणणं आम्हाला मांडू द्यावं, असंही त्यांनी सांगितलं. शंभर ते सव्वासेच्या जवळपास मनसे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस बुलढाण्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यासाठी निघाले होते. जालना जिल्ह्याच्या हद्दीत या मनसे सैनिकांना सोडले जाणार आहे. दोन बसमधून मनसे सैनिकांना जालना जिल्ह्यात सोडण्यात आले. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यासह अन्य कार्यकर्त्यांचा यात समावेश होता.

चिखलीपर्यंत मनसे कार्यकर्ते पोहचले होते. मनसे कार्यकर्त्यांना निदर्शनं करायची होती. पण, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

सावरकरांवरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते राज्यभरातून आले होते. मनसे कार्यकर्त्यांना बुलढाणा जिल्ह्याबाहेर नेण्यात आले. दुसरीकडं शेगाव येथे काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांची सभा ऐकण्यासाठी उपस्थित झालेत.

राहुल गांधी यांची थोड्यात वेळात शेगावात सभा सुरू होईल. ते या सभेत काय बोलतात, हे ऐकावं लागेल. मनसे कार्यकर्ते हे ही सभा उधळून लावण्याच्या उद्देशानं पोहचले असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान