आधी दारु ढोकसली, नंतर चालत्या बसला आडवा झाला; एसटी बसचालकाने अशी घडवली अद्दल

| Updated on: Apr 09, 2023 | 8:45 AM

तो मद्यपी एसटी बसच्या समोर आला. त्यामुळे चालकाने एसटी बस थांबवली. त्याला वाटले प्रवासी असेल. पण, नंतर त्याला वेगळेच चित्र दिसले.

आधी दारु ढोकसली, नंतर चालत्या बसला आडवा झाला; एसटी बसचालकाने अशी घडवली अद्दल
Follow us on

बुलढाणा : काही लोकं दारू पितात. त्यानंतर ती दारू त्यांना चढते. दारू चढली की ते स्वतःला बाहुबली समजतात. मी म्हणेन तसे झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. पण, त्यांच्या मनाजोगे झाले नाही तर ते आकाश पाताळ एक करतात. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला. एका मद्यपीनं मस्त दारू ढोकसली. मलकापूर तहसील चौक परिसरातील घटना. तो मद्यपी एसटी बसच्या समोर आला. त्यामुळे चालकाने एसटी बस थांबवली. त्याला वाटले प्रवासी असेल. पण, नंतर त्याला वेगळेच चित्र दिसले.

एसटी बससमोर मद्यपी आला

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तहसील चौक परिसरात ही घटना घडली. एसटी बस आली असता मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती समोर आला. त्या व्यक्तीने एसटी बस समोर येऊन बस थांबवली. चालकाचा पारा चढला. चालकाने त्या मद्यधुंद व्यक्तीला विचारणा केली. बसचालक खाली उतरला. मद्यधुंद असलेल्या व्यक्तिला चांगलाच चोप दिला.

चालकाने मद्यपीला ठाण्यात नेले

एवढ्यावरच न थांबता त्या बस चालकाने मद्यपी व्यक्तीला एसटी बसमध्ये टाकले. बस मलकापूर शहर पोलीस स्टेशनला नेली. मात्र या एसटी बस चालकाने त्या मद्यपी व्यक्तीला शिवीगाळ करत चांगलाच चोप दिलाय. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडीओत मद्यपी एसटी बस थांबवत आहे. चालक त्याला विचारणा करत आहे. पण, तो काही सांगायला तयार नाही. चालक खाली उतरला. त्याने मद्यपीला बस थांबवण्याचे कारण विचारले. पण तो काही सांगत नव्हता. शेवटी त्याचा पारा चढला. त्याने मद्यपीला चांगला चोप दिला. बसमधील प्रवासी बसखाली उतरले. त्यांनीही मद्यपीविरोधात नाराजी व्यक्त केली.

प्रवाशांचा झाला मनस्ताप

चालकाने मद्यपीला बसमध्ये बसवले. त्यानंतर बस थेट मलकापूर शहर पोलीस ठाण्यात नेली. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांचा चांगलाच मनस्ताप झाला. मद्यपी आला नसता तर ते वेळेवर घरी पोहचू शकले असते. पण, एका मद्यपीने सर्व प्रवाशांना मनस्ताप घडवून आणला. अशा मद्यपीला चोप दिल्याशिवाय काही ऐकणार नाही, अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया होत्या.