बेपत्ता असलेल्या अभियंत्याच्या बाबतीत काय घडलं?, घातपात की आणखी काही

महिना लोटून गेला. घरचे लोकं चिंतेत होते. तेवढ्यात एका दुःखद बातमी समोर आली. या युवा अभियंत्याचा मृतदेहच सापडला.

बेपत्ता असलेल्या अभियंत्याच्या बाबतीत काय घडलं?, घातपात की आणखी काही
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 7:45 AM

भंडारा : पवनीतील एक युवा अभियंता. रोजगारासाठी ठेकेदारी करायचा. वय वर्षे ४०. अचानक घरून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याची शोधाशोध करण्यात आली. पण, तो काही सापडला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. पत्ता लागला नाही. महिना लोटून गेला. घरचे लोकं चिंतेत होते. तेवढ्यात एका दुःखद बातमी समोर आली. या युवा अभियंत्याचा मृतदेहच सापडला. त्यामुळे त्याच्या बाबतीनं नेमकं काय घडलं, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

२७ फेब्रुवारीपासून बेपत्ता

पवनी येथील पद्मा वॉर्डात राहाणारा योगेश लोखंडे 27 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. ते अभियंता असल्याने ठेकेदारीचा व्यवसाय करायचे. महिनाभरापूर्वी घरून निघून गेले होते. नातेवाइकांनी शोध घेऊनही थांगपत्ता लागला नव्हता. इटगाव येथील पोलिस पाटलांना पाटामध्ये व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती मिळाली.

हे सुद्धा वाचा

पाकीटमध्ये सापडले आधार कार्ड

यावरून त्यांनी पवनी पोलिसांत कळविले. पंचनामा करताना मृताच्या खिशामध्ये असलेल्या पाकिटात आधार कार्ड मिळाले. त्यावरील पत्ता आणि छायाचित्रावरून माहिती काढली असता मृत व्यक्ती योगेश लोखंडे असल्याचे तपासात पुढे आले.

मृतदेह तपासणीसाठी नागपूरला पाठवले

मिळालेले प्रेत कुजलेल्या अवस्थेत इटगाव रस्त्यावरील प्रकाश रेहपाडे यांच्या शेतालगत असलेल्या पाटामध्ये आढळले. त्यामुळे गावामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे रवाना केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आधार कार्डावरून पटली ओळख

मागील 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या योगेश सीताराम लोखंडे या 40 वर्षीय व्यक्तीचे प्रेत इटगाव येथील शेतालगतच्या पाटामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांच्या तपासात मृताच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. त्याच्या मृत्यूचे कारण घातपात की अपघात हे रहस्य मात्र कायमच आहे.

योगेश लोखंडे घरून निघून गेला. तेव्हा त्याने कुणाला काही सांगितलं नाही. ठेकेदारी करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. तो कुठं गेला. याचा शोध घेण्यात आला. पण, योगेशचा काही पत्ता लागला नाही. शेवटी त्याचा मृतदेह सापडल्याने घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.