एटीएममध्ये रोकड भरण्याचे होते काम, 15 लाख रुपयांचा अपहार! खामगावातले प्रकरण काय?

| Updated on: Mar 05, 2022 | 11:41 AM

एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले 15 लाख रुपये दोघांनी केले लंपास केले. 2 जणांविरुद्ध खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

एटीएममध्ये रोकड भरण्याचे होते काम, 15 लाख रुपयांचा अपहार! खामगावातले प्रकरण काय?
खामगाव शहरात बँकांच्या एटीएममध्ये जमा करण्याची रोकड लंपास करण्यात आली.
Image Credit source: tv 9
Follow us on

बुलढाणा : विविध बँकांच्या एटीएम मशीनमध्ये (ATM machine of banks) पैसे भरण्याची जबाबदारी दोघांवर (The job was to deposit cash in ATM) होती. त्या दोघांनीच 15 लाख रुपयांचा अपहार केला. हा धक्कादायक प्रकार खामगावमध्ये समोर आलाय. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात सीएमएस कंपनीच्या शाखा व्यवस्थापकांनी ( branch manager of CMS company) तक्रार दिली आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. खामगाव येथील विशाल आकनकर आणि शेगाव येथील गणेश गिऱ्हे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी एकाला पोलिसांनी अटक केलीय. सीएमएस कंपनीद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम केलं जातं. हे पैसे भरण्यासाठी खामगाव शहरात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली.

दोन्ही आरोपी कर्मचारीच

या कर्मचाऱ्यांनी या सीएमएस कंपनीलाच तब्बल पंधरा लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अकोला येथील सीएमएस इन्फोसिस्टम या कंपनीत दोघे आरोपी नोकरीला होते. कंपनीकडून विदर्भातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. दोन्ही आरोपींकडे कंपनीने हे काम सोपविले होते. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या विविध बँकेतून रोकड घेऊन जातं. आणि ती रोकड खामगाव शहरात असलेल्या एटीएममध्ये भरण्याचे काम विशाल आकनकर आणि गणेश गिर्हे करत होते.

एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू

दोघांना एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले 15 लाख रुपये दोघांनी भरले नाहीत. या प्रकार कंपनीच्या व्यवस्थापकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. या प्रकरणी शहर पोलिसांनी तात्काळ या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. एका आरोपीला अटक केलीय. तर दुसरा फरार होण्यात यशस्वी झालाय. त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे यांनी दिली.

नागपूर पोलीस आयुक्तांविरोधात सुपारी व्यापारी न्यायालयात! हायकोर्टात नेमकं काय झालं?

नागपूर मनपा निवडणूक, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती, काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती काय?

VIDEO | भाजप नगरसेवकाकडून मारहाण, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याचा विक्की कुकरेजांवर आरोप