मंत्रिमंडाळाचं खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि नितेश राणेंकडं कोणतं मंत्रालय, रामदास कदमांच्या मुलाला काय मिळालं?

अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. फडणवीसांना गृहखातं तर एकनाथ शिंदे यांना नगर विकास व गृह निर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडाळाचं खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि नितेश राणेंकडं कोणतं मंत्रालय, रामदास कदमांच्या मुलाला काय मिळालं?
| Updated on: Dec 21, 2024 | 9:58 PM

अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. यामध्ये महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. दरम्यान त्यानंतर खाते वाटप मात्र रखडलं सर्व राज्याचं लक्ष खाते वाटपाकडे लागलं होतं, कोणाला कोणतं खातं मिळणार? गृहमंत्रालय, अर्थ खातं आणि महसूल खांत कोणाकडे असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं.

पंकजा मुंडे, नितेश राणेंना कोणतं खातं

नितेश राणे यांनी मंत्रिपदाची पहिल्यांदाच शपथ घेतली आहे. तर पंकजा मुंडे यांचं देखील तब्बल पाच वर्षानंतर मंत्रिमंडळात पुनरागमण झालं. त्यामुळे नितेश राणे आणि पकंजा मुंडे यांना कोणतं खात मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता प्रतीक्षा संपली आहे. पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन खातं देण्यात आलं आहे. तर नितेश राणे यांना  मत्स्य आणि बंदरे खातं देण्यात आलं आहे. रामदास कदम यांचा मुलगा योगश कदम यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारात राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे गृहराज्य शहर मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे .

खाते वाटपाची संपूर्ण यादी   

देवेंद्र फडणवीस – गृह

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

माणिकराव कोकाटे – कृषी

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us