Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवे कारनामे उघड, NCPच्या दोन्ही गटांतील नेतेही संपर्कात

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात विरोधात महिलांच्या लैंगिक शोषण, जमीन हडपण्याचे गंभीर आरोप आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुपाली चाकणकर, जयंत पाटील यांच्यासह अनेक बडे नेते व प्रशासकीय अधिकारी खरातच्या संपर्कात होते. त्यांचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी SIT चौकशीला वेग आला असून, डिजिटल फॉरेन्सिकद्वारे खरातच्या गैरकारभाराचा सखोल तपास सुरू आहे.

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवे कारनामे उघड,  NCPच्या दोन्ही गटांतील नेतेही संपर्कात
भोंदूबाबा अशोक खरात
| Updated on: Mar 20, 2026 | 8:55 AM

महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्याबद्दल दिवसेंदिवस धक्कादायक माहिती उघड होत आहे. नाशिकच्या या भोंदूबाबाचते अनेक कारनामे उघड होत असून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटातील मोठे नेते हे या भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्या संपर्कात होते असं उघड झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटातील अर्थात अजित पवार गटातील ेते आणि शरद पवार यांच्या गताली नेत्यांचा खरात यांच्याशी संपर्क होता असं उघड झालं आहे.

रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे, जयंत पाटील, निलेश लंके ही नेतेमंडळी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या संपर्कात होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अटक झालेला हा भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी केल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासंदर्भातील अनेक फोटो, तसेच व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे व्हिडीओ, फोटो तर समोर आलेलेच आहेत. त्यासोबतच जयंत पाटील असतील किंवा नाशिकमधले जे राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आहेत ते सगळे कॅप्टन खरातच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

अनेक प्रशासकीय अधिकारीही खरातच्या दरबारात

दरम्यान कॅप्टन खरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकारी असल्याचेही समोर आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या. पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर विमानतळाच्या भागात कोट्यावधींची गुंतवणूक केखल्याचे समोर आले. एवढंच नव्हे तर खऱातने अनेकांच्या जमिनी हडपल्या तर काहींवर अवैधरित्या कब्जा केल्याचेही उघड झाले. ओझर परिसरात काही बांधकाम व्यवसायिकांसोबत भागीदार होती, गेल्या आठवड्यात इमारतीचं भूमिपूजन केलं होतं अशीही माहिती उघड झाली आहे.

खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग

दरम्यान स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी SIT चौकशीला आता वेग आला आहे. डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात झाली असून फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. पोलिसांच्या हाती जे 58 व्हिडिओ लागलेल त्यामधील पीडितांना न्याय देण्यावर भर असेल. तसेच आर्थिक व्यवहार, भोंदू बाबा खरातचं नेटवर्क, तसेच संभाव्य सहकारी, आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. तसेच कॅप्टन खरात याने इतकी संपत्ती कशी जमवली याचेही विश्लेषण करण्यात येणार आहे. त्याच्याकडे एकूण 200 कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us