Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे एका 30 वर्षीय अज्ञात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. डी-मार्टजवळ गुरुवारी पहाटे ही घटना घडली. हल्लेखोराने डोक्यावर वार करून तरुणाला ठार केले आणि फरार झाला. मृतदेहाची ओळख पटलेली नाही. एनआरआय पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलीस मारेकऱ्याच्या आणि मृत व्यक्तीच्या शोधात आहेत.

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं... त्या दृश्याने पोलिसही हादरले
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 18, 2026 | 12:05 PM

मुंबईसह, राज्यात गुन्ह्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथेही असाच एक भयानक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. सीबीडी बेलापूरमधील सेक्टर 15 येथील डी-मार्टजवळ गुरुवारी पहाटे एका 30 वर्षीय अज्ञात तरुणाची डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झालं. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. या हत्याकांडाप्रकरणी NRI पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात हत्या प्रकरण दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र हत्या झालेला तो तरूण कोण, कुठला, त्याचं नवा काय, या कोणत्याही गोष्टींची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री सुमारे 1च्या सुमारास घडली. पीडित तरुण हा डी-मार्टच्या समोरील फुटपाथवर उभा होता. मात्र त्याच वेळी, एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि त्याने त्या तरूणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्याच्यावर हल्ल्यानंतर तो हल्लेखोर लागलीच तिथून फरार झाला.

पोलिसांकडून कसून शोध सुरू

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथलं दृश्य पाहून र्वांचे डोळे विस्फारले. तो तरूण रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला होता. पोलिसांनी तातडीने त्या जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती नेमकी कोण, कुठली, याची ओळख पटवण्यासाठी तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमधून मिळणार सुगावा ?

“आम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघांचीही ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास सुरू आहे.” असं पोलिसांनी नमूद केलं. आता घटनास्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्हीमधून काही माहिती मिळते का, सुदगावा लागतो का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Follow Us