AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे लिहतात, माननीय श्री. उद्धव ठाकरे जी….

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. त्यांनी या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असल्याचं म्हटलं आहे. राणे यांनी जिल्ह्यातील 06 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याची मागणी केलीय.

नारायण राणे लिहतात, माननीय श्री. उद्धव ठाकरे जी....
नारायण राणे उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. त्यांनी या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असल्याचं म्हटलं आहे. राणे यांनी जिल्ह्यातील 06 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याची मागणी केलीय. राणे यांनी हे पत्र 29 सप्टेंबर रोजी लिहलं आहे.

रुग्णावाहिकेच्या प्रस्तावावर कार्यवाही करा

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद सर्वांनाच माहिती आहे. राणे कुटुंबीय ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना माननीय म्हणत 29 सप्टेंबर रोजी एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 06 रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. “38 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 29 प्राथमिक आरोग्य केंद्रात एम्ब्युलेन्स ची सुविधा उपलब्ध आहे मात्र उर्वरित 6 प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी 13 व्या आणि 14 व्या वित्त आयोगाने उपलब्ध करून दिलेला निधीतून मिळालेल्या व्याजेच्या रकमेतून 6 एम्ब्युलेन्स खरेदी करण्याची परवानगी ग्राम विकास विभागाने द्यावी,” अशी मागणी राणे यांनी या पत्रात केली आहे.

नारायण राणे यांच्या पत्रात काय?

नारायण राणे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  जिल्हा परिषद अध्यक्षा, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे पत्र लिहिलं आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्गने 13 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त अखर्चित निधी तसेच 14 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्याजाची रक्कम रुपये 89 लाख 91 हजार 951 रुपये इतकी रक्कम शासन आदेशान्वये राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांचे खात्यामध्ये वर्ग केलेली आहे, असा उल्लेख राणें यांच्या पत्रात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेची गरज पाहता व सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील 38 प्राथमिक केंद्रांपैकी  29 प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे रुग्णवाहिका आहे. तर, 6 प्राथमिक केंद्रासाठी 13 व्या आणि 14 व्या वित्त आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतू मिळणाऱ्या व्याजातून 6 अ‌ॅम्बुलन्स खरेदीची परवानगी ग्रामविकास विभागाकडून देण्यात यावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

जिल्हा परिषद रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हा परिषदांनी सदर योजनांमधील निधीतून रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचा प्रस्ताव उपरोक्त कार्यालयाकडे अद्यापी प्रलंबित आहे. या संदर्भात जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी आपल्या विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

इतर बातम्या  :

MPSC कडे रिक्त पदांची माहिती देण्याची डेडलाईन हुकली, सरकारी विभागांची धावपळ सुरु

Maharashtra College Reopen: शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरला तर कॉलेज दिवाळीनंतर सुरु, उदय सामंतांची माहिती

मोबाईलवर गेम खेळतो म्हणून घरातल्यांनी हटकलं, रागात आई-वडिलांचा विचार न करता त्याची विहिरीत उडी

(central minister narayan rane write letter to cm uddhav thackeray demanding ambulance for sindhudurg district)

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.