AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा….

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षेसाठी रविवारचे हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहा....
sunday mega block news
| Updated on: Aug 01, 2026 | 10:26 AM
Share

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यामुळे प्रभावित होणाऱ्या फेऱ्या  खालीलप्रमाणे असतील:

मेन लाईन:

ब्लॉकचा कालावधी:

माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३६ वा.  ते दुपारी ३.१० वा. या वेळेत सुटणाऱ्या ‘डाऊन’ जलद मार्गावरील लोकल गाड्या माटुंगा येथून ‘डाऊन’ धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या लोकल गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणे येथून पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथून पुन्हा ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ वा. ते दुपारी ३.३८ वा. या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ जलद मार्गावरील लोकल गाड्या मुलुंड स्थानकावर ‘अप’ धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील, माटुंगा येथून पुन्हा ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर लाईनवर लोकल बंद

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी – वांद्रे ‘डाऊन’ हार्बर लाईन:

सकाळी ११.४० वा. ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि

चुनाभट्टी – वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‘अप’ हार्बर लाईन: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ११.१६ वा. ते सायंकाळी ४.४७ वा. या वेळेत सुटणाऱ्या वाशी-बेलापूर-पनवेल येथे जाणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर लाईनवरील लोकल गाड्या आणि सकाळी १०.४८ वा. ते सायंकाळी ४.४३ वा.  या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणाऱ्या वांद्रे-गोरेगाव येथे जाणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर लाईनवरील गाड्या रद्द राहणार आहेत.

पनवेल-बेलापूर-वाशी येथून सकाळी ९.५३ वा. ते दुपारी ३.२० वा. या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे जाणाऱ्या लोकल गाड्या आणि गोरेगाव-वांद्रे येथून सकाळी १०.४५ वा. ते सायंकाळी ५.१३ वा.  या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या ‘अप’ हार्बर लाईनवरील लोकल ट्रेनच्या फेऱ्या बंद राहणार आहेत.

२० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल

ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८)  दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम लाईन वरून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा