
Chhatrapati Sambhaji Nagar Election Result : राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 15 जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. दरम्यान या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची महापालिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती. कारण या ठिकाणी भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेन, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, काँग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता या ठिकाणी भाजपाने एकहाती सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरात एकूण 115 जागांसाठी मतदान झाले होते. 15 जानेवारी रोजीच्या मतदानानंतर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण 58 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही चांगलाच जोर लावला होता. शिवसेनेची मात्र येथे निराशा झाली आहे. शिवसेनाला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर फक्त 6 जागा मिळाल्या आहेत.
Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...
BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?
बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
एमआयएम पक्षाने मात्र येथे मोठी कमाल केली आहे. या पक्षाला एकूण 33 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा एका जागेवर विजय झाला असून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एकूण 4 जागांवर विजय झाला आहे. भाजपाने एकूण 115 पैरी 58 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे येथे भाजपाचाच महापौर होणार आहे.
कधीकाळी छत्रपती संभाजीनगर हे शहर शिवसेना या पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होते. आता मात्र महापालिका निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा किमान 25 जागांवर विजय होईल असे मानले जात होते. परंतु शिंदे यांनाही तशी किमया साधता आली नाही. उद्धव ठाकरे यांच्याासाठी हा निकाल तर फारच धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे नुकसान झाले असून भाजपाला मात्र चांगला फायदा झाला आहे.