वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही…

सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाली, या निमित्त महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीश नाराज, म्हणाले महाराष्ट्राचा असूनही...
Image Credit source: गुगल
| Updated on: May 18, 2025 | 5:05 PM

सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाली, या निमित्त महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई चांगलेच भावुक झाले. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेम पाहून भरून आलं. शपथ घेताच देशातल्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं, असं भूषण गवई यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भूषण गवई 

तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेम पाहून भरून आलं. शपथ घेताच देशातल्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं. आपले प्रेम सतत लाभलेले आहे आणी नेहमी लाभत राहील, आजचा कार्यक्रम जीवनाच्या अंतपर्यंत लक्षात राहील. माझ्या प्रवसाची सुरुवात अमरावती जिल्ह्यात झाली, नगरपरिषदेच्या शाळेमध्ये मी, शिकलो वाढलो. आज मी जो काही आहे, आई बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे, असं गवई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना गवई यांनी म्हटलं की, माझ्या जडण घडणीत मोठा वाटा हा माझ्या वडिलांचा आहे. मला आर्किटेक व्हायचं होतं, पण वडिलांना वकील व्हायची इच्छा होती पण त्यांना काही कारणांमुळे त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही, मग त्यांनी ते स्वप्न माझ्यात पाहिलं.  राजाभाऊ यांच्या सोबत मी वकिली शिकायला सुरवात केली आणि तिथून प्रवास सुरु झाला.मी मुंबईला काम केलं, नंतर नागपुरात गेलो. मी जेव्हा दहा वर्ष वकीली केली तेव्हा, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मला नागपूर येथे सरकारी वकील म्हणून काम करायला सांगितलं. त्यानंतर वयाच्या 40 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयात गेलो.  त्यानंतर मी सिनिअर ऍडव्होकेट झालो. अनेक ठिकाणी अडचणी आल्या, पण त्यातून मार्ग निघाले.  मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

2003 आणि 2019 चा प्रसंग या ठिकाणी सांगावा लागेल,  एवढे वर्ष झाले तरी शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईबचं अजून कोणीच न्यायमूर्ती नाही, त्यानंतर मला विचारलं, या काळात मला अनेक चांगले निर्णय घेता आले, नागपूरलाला अनेक झोपडपट्या होत्या, त्यावेळी मला खूप मोलाचा निर्णय मला देता आला. मला त्यावेळी नागपूरमधील लोकांच्या डोक्यावरील,  छत वाचवता आले, असंही यावेळी गवई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून यावेळी सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे असूनही पहिल्यांदाचा महाराष्ट्रात येतायेत, पण पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांना इथे यावं वाटल नाही, हे योग्य असेल तर त्याचा विचार त्यानींच करावा असं गवई यांनी म्हटलं आहे.