मुख्यमंत्री समोर येताच शेतकऱ्याला अश्रू अनावर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ढसाढसा रडला शेतकरी..
राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दाैऱ्यावर आहेत. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी फडणवीस बांधावर पोहोचले. मुख्यमंत्र्यांना पाहताच शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ दाैऱ्यावर आहेत. लातूर जिल्हात देवेंद्र फडणवीस दुष्काळाची पाहणी करत आहेत. थेट ते बांधावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत.
परिस्थिती किती जास्त गंभीर आहे, हे सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले. शेतकऱ्यांसोबत शेतीची पाहणी फडणवीस यांच्याकडून केली जात आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे.
शेतकरी राजा चिंतेत आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस लातूर जिल्हयातील पिकांची पाहणी करत असताना मुख्यमंत्र्यांना पाहून शेतकऱ्याचा अश्रूचा बांध फुटला.
मुख्यमंत्र्यासमोर शेतकरी रडताना दिसला. मुख्यमंत्र्याने शेतकऱ्याला आपल्या गळ्याला लावले. यावेळी सर्वजण भावूक झाले. यावेळी महिला देखील मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमचे भाऊ आहे, म्हणताना दिसल्या.
परिस्थिती गंभीर आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये फक्त 50 टक्के पाऊस झाल्याचे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केले आहे. शेतकऱ्यांच्या मागे सरकार असल्याचेही त्यांनी म्हटले.