साखर झोपेत आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू, देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्व माहिती..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FCRA च्या बिलावर मोठे भाष्य केले. हेच नाही तर कोणाला मिरच्या लागत असल्याचेही त्यांनी म्हटले. गडचिरोलीमध्ये तीन मुलींना झालेल्या सर्पदंशांच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी भाष्य केले.

नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहेत, त्यावर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, खासदार मोदींना भेटणार यात काही वावगं नाही. पंतप्रधानांना विरोधी पक्षाचे खासदार भेटत असतात. मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. त्यांची कामे सांगत असतात. त्यामुळे मला वाटते की, याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य नाही. ते जर तिथे गेले असतील किंवा जाणार असतील तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. तिंरगा रॅली संपूर्ण देशात होत आहेत. गडचिरोलीमध्ये तीन आश्रम शाळेतील मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. यावरही बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले. फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मुलींच्या मृत्यूवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे.
अशी बातमी मलाही मिळालेली आहे. यासंदर्भात अधिकची माहिती मी मागवली आहे. देशभक्तीचे वातावरण पसरवण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण राज्य, देशात तिरंगा रॅली होत आहे. FCRA वरही देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, FCRA चा वापर करून काही संस्था पैसे आणत आहेत.
जर याच्यावर कोणाला काही म्हणायचे असेल तर संसदेत बोलू शकतात. यात कोणत्याही एका समुदायाचा विषयच नाही. फक्त ख्रिश्चन समाजासाठी हे नाहीये. सर्व संस्थांसाठी हे आवश्यक आहे. त्यात सर्व समाजाच्या संस्था आहेत. बऱ्याच लोकांना FCRA बिल येत आहे, याची मिरची लागली. याचा अर्थ काय आहे?
मी पुन्हा एकदा सांगतो की, केंदातले सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे सरकार आहे. कोणत्याही संस्थेला परदेशातून पैसे घ्यायचे असतील तर FCRA ची परवानगी घ्यावी लागेल. FCRA च्या मुद्द्यातून संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतूनही जोरदार विरोध होत आहे. अमेरिकेच्या एका खासदारानेही FCRA च्या मुद्द्यात भारताला मोठी धमकी देत जर हे बिल पास झाले तर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होईल, अशी मोठी धमकी दिली.