CM : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडला दोन वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा, काय केलं दोन वर्षात ? वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन वर्षा कामाचा लेखाजोखा माडला आहे. त्यात ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्रिमडळाच्या काही योजनांची आणि  विकासकामांची सविस्तर माहिती दिली आहे. भाजपकडून मात्र आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना पहायला मिळत आहे. 

CM : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडला दोन वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा, काय केलं दोन वर्षात ? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 5:41 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन वर्षाच्या कामाचा लेखाजोखा माडला आहे. त्यात ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्रिमडळाच्या काही योजनांची आणि  विकासकामांची सविस्तर माहिती दिली आहे. भाजपकडून मात्र आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना पहायला मिळत आहे.

राज्यातील सुरू आणि प्रस्तावित योजना

मुंबईला नागपूरशी जोडणार 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई-पुणे महामार्गाची क्षमतावाढ, कोकणातील काही सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रो कामांची, पुणे आणि नागपुरातील मेट्रो कामे, अशा अनेक योजनांची माहिती दिली आहे.

शेतमालाची हमीभाव योजना

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत, त्याचीही माहिती देण्यात आलीय, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभावाची हमी देणारे ‘पिकेल ते विकेल’ अभियान सुरू केल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात आतापर्यंत 20 हजार कोटी जमा करण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय.

राज्यात दोन वर्षात मोठी आर्थिक गुंतवणूक

गेल्या दोन वर्षात राज्यात मोठी आर्थक गुंतवणूक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात 59 सामंज्यस्य करारासह सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती दिली आहे.

7 कोटी गरजुंना शिवभोजन थाळीचा लाभ

राज्यात जवळपास 1398 शिवभोजन केंद्रे असून आतापर्यंत जवळपास 7 कोटी गरजुंनी शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. गरजुंना मोफत जेवण उपलब्ध व्हावं यासाठी ही योजन सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक कुटुंब म्हणून कोविडशी  लढा दिला आणि त्याबाबत काय उपाययोजना केल्या हेही सांगण्यात आलंय.

Ajit Pawar | कोरोनाचा नवा विषाणू जगभरात पसरतोय, लस घ्या; अजित पवारांचं जनतेला आवाहन

लाँचिंगआधीच वनप्ल्स केअर अ‍ॅपवर OnePlus 9RT ची झलक, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

शेतकऱ्याची कन्या होणार मंत्र्याची सून; गुलाबराव पाटलांच्या घरीही सनई चौघड्यांचे सूर