लाँचिंगआधीच वनप्ल्स केअर अ‍ॅपवर OnePlus 9RT ची झलक, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

OnePlus 9RT लवकरच भारतात लाँच होईल, परंतु अद्याप या फोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. हे डिव्हाईस नुकतेच भारतात OnePlus Care अॅपवर पाहायला मिळाले आहे.

लाँचिंगआधीच वनप्ल्स केअर अ‍ॅपवर OnePlus 9RT ची झलक, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन
लाँचिंगआधीच वनप्ल्स केअर अ‍ॅपवर OnePlus 9RT ची झलक
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 5:33 PM

मुंबई : OnePlus 9RT लवकरच भारतात लाँच होईल, परंतु अद्याप या फोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. हे डिव्हाईस भारतात OnePlus Care अॅपवर पाहायला मिळाले आहे, जे सूचित करते की, हा मोबाइल लवकरच भारतात दाखल होऊ शकतो. वास्तविक, कंपनी दरवर्षी तिसऱ्या तिमाहीत “T” व्हर्जन लाँच करते, परंतु यावर्षी हे व्हर्जन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे, परंतु भारतात ते कधी लॉन्च केले जाईल याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 91 मोबाईल्सने नुकतीच याबाबतची काही माहिती शेअर केली आहे. (OnePlus 9RT spotted on OnePlus Care app in India, know price and features)

OnePlus 9RT पूर्वी ऑक्टोबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता आणि आता भारतात लॉन्च होण्याची प्रतीक्षा आहे. भारतातील या मोबाइल फोनचे फीचर्स चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या व्हर्जनसारखेच असतील. यात 6.62 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला जाईल. भारतात या स्मार्टफोनची किंमत नुकतीच उघड झाली आहे. ही किंमत 40-44 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. ट्विटर प्लॅटफॉर्मवरील एका टिपस्टरने याचा खुलासा केला आहे.

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9RT चीनमध्ये लाँच झाला आहे. ज्यामध्ये 6.62-इंचांचा ई 4 एमोलेड डिस्प्ले आहे, जो 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. तसेच, त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बसवला आहे.

OnePlus 9RT चा प्रोसेसर आणि रॅम

वनप्लस 9 आरटीच्या हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 12 जीबी पर्यंत रॅमसह येतो. तसेच, यात 256 GB UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन 19067.44 MM2 स्पेस कूलिंग सिस्टमसह येतो, जो गेमिंग दरम्यान स्मार्टफोन थंड ठेवतो.

OnePlus 9RT चा कॅमरा सेटअप

OnePlus 9RT च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सोनी IMX766 चा सेन्सर आहे, ज्यामध्ये बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल f / 1.8 अपर्चर आहे, त्यामध्ये 6P लेन्स देण्यात आली आहे. ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन दोन्हीचे वैशिष्ट्य यामध्ये देण्यात आले आहे. तसेच, या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जो 123 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तसेच, यात 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

OnePlus 9RT ची बॅटरी

OnePlus 9RT मध्ये 4500 mAh बॅटरी आहे, जी 65 टी Wrap चार्जिंगसह येते. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ColorOS 12 वर सादर करण्यात आला आहे, परंतु इतर देशांमध्ये तो OxygenOS 12 सह लाँच होऊ शकतो. मात्र, भारतात लॉन्च झालेल्या वनप्लस 9 आरटी चे सर्व स्पेसिफिकेशन्स सारखेच असतील की त्यात काही बदल होतील हे अजून कळलेले नाही.

इतर बातम्या

जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये

(OnePlus 9RT spotted on OnePlus Care app in India, know price and features)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.