आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये

कंपनीचा दावा आहे की Google Pay च्या नवीन ग्रुप पेमेंट फीचरच्या मदतीने ग्रुपमधील अनेक लोक पेमेंट करू शकतील. तसेच पैशाचे व्यवहार एकाच वेळी अनेक लोकांशी करता येतात.

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये
गुगल पे
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 7:00 AM

नवी दिल्ली : महाकाय टेक कंपनी Google ने आपल्या UPI आधारित पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay साठी नवीन वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. कंपनीचा दावा आहे की नवीन फीचर्समुळे यूजर्सना गुगल पे सह व्यवहार करणे सोपे जाईल. गूगल पे चे उपाध्यक्ष अंबरीश केंगे यांच्या मते, गूगल पे अॅपद्वारे दरवर्षी सुमारे 15 अब्ज डिजिटल व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत गूगलने गूगल पे अॅपसाठी ग्रुप पेमेंट फीचरची घोषणा केली आहे.

काय फायदा होईल?

कंपनीचा दावा आहे की Google Pay च्या नवीन ग्रुप पेमेंट फीचरच्या मदतीने ग्रुपमधील अनेक लोक पेमेंट करू शकतील. तसेच पैशाचे व्यवहार एकाच वेळी अनेक लोकांशी करता येतात. याशिवाय GPay ला अधिक युजर फ्रेंडली बनवण्यासाठी गूगलकडून हिंग्लिश भाषेला सपोर्ट केला जात आहे. कंपनीवर विश्वास ठेवला तर पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये गूगल पे अॅपमध्ये हिंग्लिश भाषा उपलब्ध होईल. गुूगलच्या मते, हिंग्लिश भाषेला सपोर्ट देणारे Google हे पहिले UPI पेमेंट प्लॅटफॉर्म असेल.

Bill Split

हे फीचर ग्रुप पेमेंट प्रमाणे काम करते. यामध्ये यूजर्स एकाच वेळी अनेकांना पैसे ट्रान्सफर करू शकतील. समजा तुम्हाला 315 रुपये चार लोकांना ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला पेमेंट पर्यायावर जाऊन 1260 रुपये टाकावे लागतील. यानंतर चार जणांची नावे निवडावी लागतील. यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 315 रुपये ट्रान्सफर होतील.

Speech to text

Google चे आगामी लॉन्च स्पीच टू टेक्स्ट आहे. ज्याच्या मदतीने यूजर्स थेट बोलून इतर बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतील. यासाठी वापरकर्त्यांना हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोलून बँक खाते क्रमांक टाकावा लागेल.

My Shop

Google Pay ला नवीन My Shop वैशिष्ट्य दिले जाईल. जेथे लहान दुकानदार गूगल पे अॅपवर त्यांची सर्व यादी प्रदर्शित करण्यास सक्षम असतील. यासोबतच तुम्हाला दिवसभरातील व्यवहारांची माहिती मिळू शकेल. तसेच, आपण उत्पादनाची किंमत सूचीबद्ध करण्यास सक्षम असाल. (Money transactions with Google Pay will now be easier, with great features)

इतर बातम्या

Koo अ‍ॅपचा जगभर डंका, एशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या लोकप्रिय डिजिटल ब्रँड्समध्ये स्थान

अपकमिंग सुझुकी ऑल्टोचे स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.