तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक
जागतिक स्तरावर सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड अजूनही '123456' आहे, परंतु भारतातील बहुतेक लोक पासवर्ड म्हणून "password" वापरतात. असे निरुपयोगी पासवर्ड देशातील 17 लाखांहून अधिक ऑनलाइन वापरकर्ते वापरतात.

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी 'हा' पासवर्ड वापरत नाही ना?
नवी दिल्ली : हॅकर्सचा ऑनलाइन हल्ला टाळण्यासाठी पासवर्ड हा सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा स्तर असतो. म्हणूनच तुम्ही साइन अप केलेली कोणतीही ऑनलाइन सेवा तुम्हाला अक्षरे, संख्या आणि अगदी वर्णांनी भरलेला मजबूत पासवर्ड तयार करण्याची सूचना देते. परंतु अनेक प्रकरणांमध्ये असे दिसते की लोक हा नियम काटेकोरपणे पाळत नाहीत आणि पासवर्ड निवडताना निष्काळजी असतात.