मोठी बातमी ! अभिजित दीपकेंच्या आंदोलनात मोठा राडा, पोलिसांचा हस्तक्षेप
मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरु आहे. एकीकडे आंदोलन सुरु असताना दुसरीकडेमात्र शिवाजी पार्कवर गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे. काही तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरु आहे. एकीकडे आंदोलन सुरु असताना दुसरीकडेमात्र शिवाजी पार्कवर गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे. काही तरुणांची एकमेकांना मारहाण सुरु होती, त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. पण यामुळे काही काळ तणावाचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळालं. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. पण या आंदोलनात आता गोंधळाचं वतावरण तयार झालं आहे. थोड्यावेळापूर्वी दीपके आणि अनेक वक्त्यांनी त्यांची भाषणं केली. पण या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही तरुणांच्या दोन गटांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सीजेपीचे आंदोलक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित झाले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. तिथेच काहीवेळापूर्वी ही घटना घडली आहे. दोन गटांच्या विविध घोषणा सुरु होत्या. या घोषणांदरम्यान, तरुणांचे दोन्ही गट आमनेसामने आले. त्यांच्यामध्ये थेट हाणामारीच सुरु झाली.ही हाणमार पाहताच पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही तरुण खाली पडलेले पाहायला मिळाले. त्यांनी एकमेकांना हाणमार सुरु केलेली पाहताच पोल एक गट मोठी घोषणाबाजी करत होता.
