CJP protest : त्या आंदोलकांना सुट्टी नाहीच थेट…; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत सर्वात मोठा निर्णय

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर -मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. दरम्यान आता या आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांवर सरकारकडून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

CJP protest : त्या आंदोलकांना सुट्टी नाहीच थेट...; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत सर्वात मोठा निर्णय
सरकारचा मोठा निर्णय
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 30, 2026 | 6:20 PM

नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर -मंतरवर तब्बल एक महिना कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू होतं, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र या मोर्चादरम्यान दिल्ली पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात आता दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली पोलिसांकडून 13 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे, जे आंदोलक होते, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, परंतु ज्या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असे जे लोक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, या लोकांवर कारवाई केली जाईल, त्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही असं दिल्ली सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

या आंदोलन प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आलं आहे, किंवा ताब्यात घेतलं आहे, अशा लोकांच्या सुटकेची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, आंदोलकांवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे प्रकरणं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, किंवा ज्यांना अटक करण्यात आलं आहे, अशा लोकांची तपासणी करण्यात येणार आहे, जे आंदोलक आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाहीये, परंतु ज्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार असल्याचं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा इशारा 

दरम्यान कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल होऊ नये, अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा आंदोलन सुरू करावं लागेल असा इशारा कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.  यावर आता सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे, जे आदोंलक होते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, परंतु ज्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे, त्यांना मात्र सुट मिळणार नाही, असं सरकारने म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us