मोठी बातमी! सीजेपीचा सर्वात मोठा निर्णय, 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणारं आंदोलन मागे

मोठी बातमी समोर येत आहे, सीजेपीच्या वतीने येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन होणार होतं. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टात तशी माहिती देखील देण्यात आली आहे.

मोठी बातमी! सीजेपीचा सर्वात मोठा निर्णय, 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणारं आंदोलन मागे
सीजेपीचं आंदोलन मागे
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 3:09 PM

मोठी बातमी समोर येत आहे, सीजेपीच्या वतीने येत्या 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन होणार होतं. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सीजेपीचे नेते सौरभ दास यांनी त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात माहिती दिली आहे. नीट परीक्षा पेपर फुटीनंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं होतं. सरकारी यंत्रणेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर या प्रकरणात अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने उडी घेतली. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी जतंर मंतरवर तब्बल एक महिन्यापेक्षा अधिककाळ आंदोलन सुरू होतं. संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 25 जुलै रोजी हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. यावेळी सरकारच्या वतीने आंदोलकांना काही आश्वासनं देखील देण्यात आले होते.  मात्र अजूनही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा एकदा पाच सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन रद्द करण्यात आलं आहे.

दिल्लीच्या इंडिया गेटपासून ते पोलीस मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र हा मोर्चा अवघ्या काही दिवसांवर असताना आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली. सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे मागे घेण्यासाठी आणि नुकसान भरपाईच्या मागणीसंदर्भात ही सुनावणी सुरू होती. यावेळी सरकारच्या बाजूने स्पष्ट करण्यात आलं की आम्ही गुन्हे मागे घेण्यास तयार आहोत, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यास देखील सरकार सकारात्मक आहे. त्यानंतर आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत, असं सौरभ दास यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us