मोठी बातमी! सुट्टे तेल विक्री करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ , सरकारने तुकाराम मुंढेंचा निर्णय फिरवला
मोठी बातमी! सुट्टे तेल विक्री करण्यासाठी 1 वर्षाची मुदत, तुकारा मुंढेंचा निर्णय फिरवला

Loose Oil Ban Rule : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील भेसळ कमी झाली आहे. खाद्यपदार्थातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे जेवण आढळताच तुकाराम मुंढे थेट कारवाई करताना दिसत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सुट्ट्या तेलाची विक्री बंद केली. खाद्यतेलाची विक्री करताना तेलकंपन्यांना नियमांचे पालन करावे लागेल, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक, व्यापारांना मोठा फटका बसत आहे, असा दावा केला जात होता. असे असतानाच आता राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय फिरवला आहे. सुट्टे खाद्यतेल विकण्यासाठी सरकारने एका वर्षाची मुदत दिली आहे.
सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
सुट्टे तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी फडणवीस यांना सांगितल्या. याच चर्चेनंतर व्यापाऱ्यांना सुटे तेल विकण्यासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मात्र यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्वांना कायदा पाळावाच लागेल. या 1 वर्षात प्रत्येकाने आपल्या व्यवसायात अनुकूल बदल करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : 2011 मध्ये हा कायदा झाला, गुणवत्ता हा महत्वाचा निकष पण अनेक गरीब माणसं सुटे तेल घेतात त्यामुळे कायदा आणि सामान्य माणूस यातून मार्ग काढला पाहिजे कायद्याचे पालन करताना पारंपरिक व्यावसायिकांना काय बदल करावे लागतील, यासाठी समिती गठित करणार एफडीए आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती आवश्यकता भासल्यास राज्य सरकार मदत करणार तात्पुरती 1 वर्षाची सुट.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
