AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे भाजपचे कार्यकर्ते भिडले! मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त, मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं

काल अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयात जात पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला होता. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत आंदोलन केले होते.

मनसे भाजपचे कार्यकर्ते भिडले! मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त, मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं
BJP MNS Rada MumbaiImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 01, 2026 | 4:07 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप युवा मोर्चा आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचे समोर आले आहे. काल अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयात जात पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला होता. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत आंदोलन केले होते. यावेळी मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची माहिती समोर आली आहे.

अमित ठाकरेंविरोधात आंदोलन

समोर आलेल्या माहितीनुसार, अमित ठाकरेंच्या कृतीविरोधात आज भाजप युवा मोर्चाकडून माहिममध्ये आंदोलन करण्यात येत आहे. भाजप आंदोलक शिवतीर्थाकडे निघाले असता मनसे आणि भाजपचे कार्यकर्ये एकमेकांशी भिडले. सध्या शिवतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. तसेत मुंबईच्या आजूबाजूचे मनसैनिक शिवतीर्थाबाहेर जमले आहेत. आता या राड्याप्रकरणी मनसेचे नेते गजानन काळे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांची पाहणी करण्यास गेलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे. या कॉलेजमध्ये गेल्यावर अमित ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नसण्यावरून कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी एका विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो काढण्यास सांगितला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्याने तातडीने पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला होता. याप्रकरणी आता वादाला सुरुवात झाली आहे.

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

अमित ठाकरे यांच्यावर आज पुण्यातील महाविद्यालय मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अमित ठाकरे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. विनापरवानगी महाविद्यालयात घुसल्याने चतुश्रुंगी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप